Hair Care Dos : तुमच्या केसांचे आयुष्य असे वाढवा..!

Hair Care Dos And Don'ts : चांगल्या हेअर स्टाइलच्या सहाय्याने आणि केसांच्या व्यवस्थित ठेवणीनुसार आपण आपल्या केसांचं आयुष्य कसे वाढवू शकतो.
Best Hair Care Tips In Marathi
Best Hair Care Tips In MarathiSaam Tv

मुंबई: तुम्हाला देखील असे वाटत असेल की, वाढत्या वयात केसांसोबत नवनवीन प्रयोग करणे म्हणजे कलरिंग किंवा नवी हेअर स्टाइल करणे योग्य नाही, तर तुम्हाला तुमची विचारसरणी बदलणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या केसांची (Hair) अशी निगा (Care) राखा ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व उठून दिसेल. चांगल्या हेअर स्टाइलच्या सहाय्याने आणि केसांच्या व्यवस्थित ठेवणीनुसार आपण आपल्या केसांचं आयुष्य कसे वाढवू शकतो. याविषयी काही सोपे उपाय (Hair Care Tips) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (How to care for your hair? Best Hair Care Tips In Marathi)

हे देखील पाहा -

⦁ आठवड्यातून किमान दोन वेळेस केसांना तेल लावा. केसांना तेल लावताना केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत लावावे. यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते.

⦁ हल्ली बाजारात नवनवीन प्रकारचे तेल व सिरम मिळते त्याचा देखील वापर करु शकता.

⦁ तुमचे केस जर लांब असतील तर तुम्ही सहा ते आठ आठवड्यांनंतर एकदा केसांना अवश्य ट्रिम करायला हवे. तुमचे केस लांब आहेत, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्यांना कात्रीच लावाण्याचा विचार करायचा नाही. छोट्या केसांप्रमाणेच लांब केसांनाही योग्य शेप किंवा आकारात ठेवणं आवश्यक असते.

⦁ तुमच्या केसांना नियमितपणे ब्लो ड्राय करा, तसेच केस धुताना कंडिशनरचा वापरही करा. ब्लो ड्राय नेहमी डोक्याच्या वरच्या भागापासून खालच्या बाजूने करा. यामुळे आपल्या केसांची आयु वाढण्यात मदत होते. यामुळे केसांची नैसर्गिक चमक टिकून राहील. तसेच केसांसाठी फ्लॅट ब्रशचा आधी वापर करा, त्यानंतर खालच्या केसांसाठी गोल ब्रशने ब्लो ड्राय करा. लक्षात ठेवा, ही प्रक्रिया केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंतची करायची आहे.

Best Hair Care Tips In Marathi
उन्हाळ्यात 'ही' फळे खा आणि शरीरातील पाण्याची पातळी वाढवा..!

⦁ ब्लो ड्रायनंतर केसांना नेहमी थोडं सीरम लावा. यामुळे तुमचे केस चमकदार होतील व धुळीपासून सुरक्षित राहातील.

⦁ केसासाठी कधीतरी तुम्ही हलक्या आयनचा वापर करू शकता, पण आयन करताना केसांच्या मुळांपर्यंत करु नका. त्यामुळे केस रूक्ष तर होतात त्याचबरोबर केसांना हानी देखील पोहोचू शकते.

⦁ हेअर स्प्रेचा वापर करताना केसांना बोटांच्या साह्याने तुम्ही तुमच्या मनासारखा आकार देऊ शकता. यामुळे तुमची हेअर स्टाइल आकर्षक बनेल व तुम्ही सुंदर दिसाल.

⦁ केसांना त्याचा नैसर्गिक रंग मिळू द्या. वयामानानुसार केसांमध्ये बदल होत असतात त्यामुळे केसांना कलरिंग करु नका. यामुळे केसांची वाढ खुंटते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. कृपया तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com