तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर कुठे होतोय? सोप्या पद्धतीने शोधता येणार

सरकारने आधार कार्डला अनेक गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचे केले आहे. आजकाल आधार कार्डचा वापर पडताळणीसाठी सगळीकडे केला जातो. आधार कार्डवर महत्वाचा तपशील लिहिलेला असतो.
तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर कुठे होतोय? सोप्या पद्धतीने शोधता येणार
Aadhar CardSaam Tv

सरकारने आधार कार्डला अनेक गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचे केले आहे. आजकाल आधार कार्डचा वापर पडताळणीसाठी सगळीकडे केला जातो. आधार कार्डवर महत्वाचा तपशील लिहिलेला असतो. तसेच आधार कार्ड इतर महत्वाच्या गोष्टींसोबत लिंक असल्याने त्यात आपली जवळपास सर्वच माहिती दडलेली असते. या कारणामुळे सायबर फ्रॉड्सला याद्वारे माहिती काढून फसवणूक करणे सोपे झाले आहे. त्यामुळे आपल्या आधार कार्डचा (Aadhar Card) वापर आपल्या न कळत कुठेतरी होत तर नाहीये ना हे आपण जाणून घेतले पाहिजे.

आजच्या तारखेत अनेक कागदपत्रे एकमेकांशी जोडलेली आहेत. उदाहरणार्थ, आयकर रिटर्न (Income tax Return) भरण्यासाठी आधार आणि पॅन कार्ड (Pan Card) लिंक करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणाहून लोकांची महत्त्वाची माहिती चोरली जाते, तेथून त्यांना आधार तपशीलांसह पॅनचा तपशील मिळवणे सोपे झाले.

Aadhar Card
'या' कंपनीची मोठी घोषणा! कर्मचाऱ्यांना देणार आठवड्यातून 3 दिवस सुट्या...

आधार कार्डची प्रत अनेक महत्वाच्या कामांसाठी वापरली जाते. हे सर्व पाहता आधार तपशीलाचा गैरवापर होण्याची शक्यता वाढली असून अनेक लोकांची फसवुक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आपण अश्या अनेक घटना रोज ऐकत असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत, तुमच्या आधार कार्डचा कुठे गैरवापर होत आहे हे शोधून काढता आले, तर तुम्ही संभाव्य फसवणूक टाळू शकता. जर कोणी तुमच्या परवानगीशिवाय आधार वापरत असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रारही करू शकता. यासाठी तुम्ही UIDAI कडून आधार कुठे कुठे वापरला गेला आहे हे तपासू शकता… तर जाणून घ्या त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे..

हे देखील पहा-

आधार कुठे वापरला गेलंय हे कसं तपासायचं?
- सर्वप्रथम resident.uidai.gov.in या वेबसाइटवर जा.
- आता येथे तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्‍यात My Aadhaar पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री या पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक विचारला जाईल आणि तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल.
- आता OTP Verification पर्यायावर क्लिक करा.
- आता यानंतर एक टॅब उघडेल.
- आता तुम्हाला आधार हिस्ट्री पहायची आहे ती तारीख इथे टाका.
- आता OTP साठी रेकॉर्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर ओटीपीची पडताळणी करावी लागेल.
-आता तुम्हाला आधार हिस्ट्री दिसेल. तुम्ही आधार हिस्ट्री डाउनलोड देखील करू शकता.

Aadhar Card
देशातील सर्वात मोठा LIC IPO गुंतवणूकदारांसाठी खुला; जाणून घ्या महत्वाची माहिती

तक्रार करण्याचा पर्याय;
तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही UIDAI च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर तक्रार करू शकता किंवा तुम्ही help@uidai.gov.in ई-मेल आयडी द्वारे तक्रार नोंदवू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.