
Apple कंपनी 12 सप्टेंबर रोजी Apple iPhone 15 सीरिज लॉन्च करणार आहे. या इव्हेंटमध्ये Apple कंपनी iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max हे फोन लॉन्च करणार आहे. मात्र नवीन फोन लॉन्च झाल्यानंतर जुन्या सीरिजचे फोन काही प्रमाणात स्वस्त होऊ शकतात.
मात्र तुम्हीही स्वस्तात आयफोन घेत असताल तर तुमची फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टी नीट तपासून घेणे गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला डुप्लिकेट किंवा रिफर्बिश फोन विकला जाऊ शकतो. तर नवा आयफोन घेताना काय काळजी घ्याल यावर एक नजर टाकूया.
ओरिजनल iPhone मॉडेल्स IMEI क्रमांकासह येतात. अशा परिस्थितीत तुमचा आयफोन ओरिजनल आहे का हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे IMEI तपासणे.
तुम्हाला ओरिजनल पॅकेजिंगमध्ये IMEI नंबर सापडेल. तुम्हाला बॉक्समध्ये IMEI नंबर लिहिलेला दिसेल. (Latest Marathi News)
iPhone वरून IMEI नंबर तपासण्यासाठी, सेटिंग्समध्ये जा. तिथून General वर क्लिक करा. त्यानंतर About वर टॅप करा. इथे तुम्हाला तुमचा IMEI नंबर खाली स्क्रोल केल्यावर दिसेल. जर IMEI दिसत नसेल तर तुमचा बनावट असू शकतो.
तुम्ही खरेदी करत असलेला फोन नवीन आहे जुना हे तपासण्यासाठी Apple ची https://checkcoverage.apple.com/ वेबसाईची मदत होईल. इथे तुम्ही फोनमधील सीरिअल नंबर टाकून तुमचा फोन ओरिजनल आहे की फेक चेक करु शकता. (Tech News)
आयफोनच्या सेटिंगमध्ये जा. About मध्ये तुम्हाला मॉडेल नंबर दिसेल. त्याचं पहिलं अक्षर जर M असेल तर तो आयफोन ब्रँड न्यू म्हणजेच नवीन आहे. जर पहिलं अक्षर N असेल तर त्याचा कुठला तरी पार्ट रिप्लेस केलेला असेल. जर त्याचं पहिलं अक्षर F असेल तर फोन रिफर्बिश केलेला असेल. त्यामुळे नवीन आयफोन घेताना शक्यतो तो अधिकृत डीलरकडूनच घ्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.