Cleaning Tips : अशी राखा तुमच्या घरातल्या कुलरची स्वच्छता..!

कमी बजेटमध्ये परफेक्ट कूलिंग देण्यासाठी कूलर हा चांगला पर्याय आहे.
Cleaning Tips : अशी राखा तुमच्या घरातल्या कुलरची स्वच्छता..!
Cooler cleaning tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्यात घर थंड (Cold) ठेवण्यासाठी अनेकजण एसी, कूलर, पंख्यांची मदत घेतात. सहसा, पंखे आणि एसीची वेळोवेळी साफसफाई केली जाते. पण, हिवाळा येताच काही लोक कूलर काढून टाकतात आणि उन्हाळ्यात पुन्हा स्वच्छ करून कुलर वापरण्यास सुरुवात करतात. मात्र, कुलर साफ करताना काही चुका झाल्यामुळे कूलर खराब होऊ शकतो. त्यामुळे कुलर धुताना, कुलिंग पॅड, जाळी साफ (Cleaning) करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामुळे कूलर बराच काळ खराब होण्याऐवजी ताजी आणि थंड हवा देण्याचे काम करतो. (Cooler cleaning tips in marathi)

हे देखील पहा -

अर्थात, कमी बजेटमध्ये परफेक्ट कूलिंग देण्यासाठी कूलर हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी कूलर वापरणे अनेकांना आवडते. पण अनेक वेळा कुलर साफ करताना लोकांच्या नकळत काही सामान्य चुका होतात. इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने कूलर लवकर खराब होतो. अशा वेळी कूलर स्वच्छ करण्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही कूलरला बराच काळ खराब होण्यापासून वाचवू शकता.

अशी राखा कुलरची स्वच्छता...

१. कूलरला पाण्याने धुवू नका -

जर तुम्ही कूलर वारंवार पाण्याने धुतल्याने तो लवकर खराब होतो आणि त्यातून पाणी टपकू लागते. शिवाय मोटरमध्ये पाणी (Water) शिरण्याची भीतीही असते. त्यामुळे कुलर स्वच्छ करण्यासाठी ओल्या कपड्याची मदत घ्या.

Cooler cleaning tips
तुम्ही देखील डेटिंग अँप्स वापरत असाल, तर हे लक्षात ठेवा.

२. जाळी साफ करा -

कुलरसमोरील जाळी साफ करण्यासाठी त्यावर थेट पाणी टाकणे टाळावे. त्यामुळे कुलरच्या पंख्यात पाणी शिरून कुलर लवकर खराब होऊ शकतो. कुलरची जाळी स्वच्छ करण्यासाठी ती उघडून बाहेर काढा नंतर ती ओल्या कपड्याने पुसून पुन्हा लावा.

३. टाकीची काळजी घ्या -

कुलरमध्ये सतत पाणी भरत राहिल्याने टाकीत सहज घाण जमा होते. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक कूलरची टाकी स्वच्छ करण्यासाठी अवजड वस्तूंचा वापर करतात. पण ही टाकी साध्या पत्र्यापासून बनलेली आहे हे लक्षात असू द्या. त्यामुळे कठीण अवजड वस्तूंमुळे टाकीला छिद्र पडू शकतात. म्हणून, टाकी स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करा.

४. कूलिंग पॅड धुणे टाळा -

कूलरचे कूलिंग पॅड वारंवार धुतल्याने ते पातळ आणि खराब होतात. अशा परिस्थितीत, कूलर थंड हवेचा पुरवठा कमी करतो आणि लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे कूलिंग पॅड जास्त धुणे शक्यतो टाळा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.