Anger Management Tips : तुम्हालाही लगेच राग येतो? स्वत:ला कसे ठेवाल शांत, या टिप्स फॉलो करा

Anger Control : रागावर नियंत्रण कसे ठेवाल? जाणून घेऊया.
Anger Management Tips
Anger Management TipsSaam Tv

How To Control Anger :

आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात की, त्यांना कोणत्याही गोष्टींमुळे सहज राग येतो. बदलेली जीवनशैली आणि कामच्या ताणामुळे आपल्या वागण्यात झपाट्याने बदल होतो आहे. त्यामुळे तरुणांमध्ये सर्वात मोठा बदल होतोय वाढत्या रागाचा.

अति राग आरोग्यासाठी घातक ठरतो आहे. परंतु, त्यामुळे तुमच्या स्वभावावर परिणाम होतो. यामुळे तुम्ही अतिप्रमाणात चिडचिड करु लागता. जेव्हा तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवता येत नाही तेव्हा तो शरीरासाठी हानिकारक ठरतो. रागावर नियंत्रण कसे ठेवाल? जाणून घेऊया.

Anger Management Tips
Besan Ladoo Side Effects : चवीचवीने खाताय बेसनाचा लाडू ठरु शकतो आरोग्यासाठी घातक!

1. दीर्घ श्वास घ्या

ज्या क्षणी तुम्हाला राग (Anger) अतिप्रमाणात येईल त्यावेळेस स्वत:ला शांत ठेवण्यासाठी दीर्घ श्वास घ्या. त्यामुळे स्वत:ला शांत ठेवण्यासाठी चांगला पर्याय मिळेल.

2. मेडिटेशन आणि योग

नियमित स्वरुपात मेडिटेशन आणि योग (Yog) करा. यामुळे रागावर बऱ्यांपैकी नियंत्रण ठेवता येते. योग केल्याने संयम वाढवण्यासाठी प्रभावी असल्याचे आढळले आहे.

3. थंड पाणी

जर तुम्हाला राग येत असेल तर थंड पाण्याने (Water) चेहरा धुवा. विज्ञानामध्ये डायव्हिंग रिफ्लेक्स नावाची एक प्रक्रिया आहे, ज्यानुसार आपण एका भांड्यात थंड पाण्याच्या भांड्यात तोंड टाकतो आणि काही सेकंद ठेवतो आणि श्वास घेण्यापूर्वी तोंड बाहेर काढतो. या काळात शरीराची मज्जासंस्था मनाला अशा प्रकारे व्यस्त ठेवते की रागामुळे होणारी हृदय गती नियंत्रित होऊ लागते. थंड पाणी प्यायल्याने राग शांत होतो.

4. पुरेशी झोप घ्या

तणावग्रस्त आणि थकल्यामुळेही आपली चिडचिड होते. राग अनावर होतो. तसेच शरीर पूर्णपणे तणावमुक्त करायचे असेल तर रागावर नियंत्रण ठेवायला हवे. जेव्हाही राग येईल तेव्हा पुरेशी झोप घ्या.

Anger Management Tips
Biggest Ganesh Murti In Mumbai : मुंबईतली सर्वात उंच गणेशमूर्ती पाहिलीत का?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com