
किडनी हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. रक्त शुद्ध करण्यापासून ते विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतो. आपण कोणतेही पदार्थ खातो किंवा पितो ते किडनी फिल्टर करुन त्यातील कचरा बाहेर फेकते.
किडनी ही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास सक्षम नसल्यास ते घटक शरीरात साचतात ज्यामुळे किडनीसोबत, यकृत आणि इतर अवयवांवर परिणाम होतो. ज्यामुळे किडनी स्टोन, पोटदुखी, थकवा, डोकेदुखी आणि शरीर सुजणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
1. किडनी साफ करण्यासाठी योग्य मार्ग कोणता?
किडनीचे (Kidney) आरोग्य सुधारण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. काही भाज्यांचे सेवन नियमितपणे केल्यास किडनी स्वच्छ होण्यास मदत होईल. जर तुम्हालाही किडनीचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर आहारात या भाज्यांचा समावेश नक्की करा.
2. शिमला मिरची
शिमला मिरची ही किडनीच्या आरोग्यासाठी (Health) फायदेशीर समजली जाते. यामध्ये जीवनसत्त्व क चांगले असते. ज्यामुळे किडनी स्वच्छ होते. यात असणारे अँटिऑक्सिडंट्स शरीराला किडनीच्या आजारांपासून रोखण्यास मदत करतात.
3. पालक
किडनीच्या आरोग्यासाठी पालक (Spinach) अधिक गुणकारी आहे. यामध्ये फायबर, फोलेट आणि लोह असते. ज्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते. पालक खाल्ल्याने शरीरातील रक्त शुद्ध होते. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
4. गाजर
गाजरमध्ये असणारे जीवनसत्त्व ए चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते.
5. टोमॅटो
टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते जे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो. परंतु, याचे सेवन करताना यातील बिया काढून खाव्यात.
6. लाल मिरची
लाल मिरचीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण कमी असते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन बी 6 आणि फायबर चांगल्या प्रकारे असते. त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह आणि चयापचय सुधारते. जे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.