
Pink Blush Makeup : आपण सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लूक कस्टमाईज करतो. सोबतच लूक चांगला होण्यासाठी आऊटफिटनुसार तुम्ही मेकअप करणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याचदा अनेक मुली पिंक ब्लश मेकअप करने पसंत करतात. परंतु चांगला मेकअप लूक होण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.
बेस कसा तयार करावा -
तुम्हाला जर का पिंक ब्लश मेकअप लूक हवा असेल तर, तुम्हाला मेकअप बेस ड्यूई ठेवायला पाहिजे. असं केल्याने तुम्ही लावलेला ब्लश अतीशय सुंदर आणि हायलाईट होउन दिसेल. यासाठी तुम्ही लिक्विड हायलाईटरचा वापर करू शकता. सोबतच तुम्ही टिंटेड प्रायमरचा वापर करू शकता. लिक्विड हायलाईटरचे दोन थेंब फाउंडेशनमध्ये मिक्स करून तुम्ही एक उत्तम बेस बनवू शकता.
नॅचरल फिनिशिंग महत्त्वाची आहे -
पिंक ब्लश तेव्हाच चांगली दिसते जेव्हा मेकअप नॅचरल आणि मिनीमल असेल. याशिवाय तुम्ही हेवीबेस मेकअपचा वापर कराल तर, तुमचा मेकअपलुक अतिशय भरगच्च दिसेल. त्यासाठी तुम्ही हवं असेल तर फक्त कन्सीलरच्या सहाय्याने काळे डाग लपवू शकता आणि फाउंडेशन स्किप करू शकता. सोबतच संपूर्ण मेकअप ब्लेंड करण्यासाठी तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा वापर करा. ब्युटी ब्लेंडरच्या वापराने तुमचा मेकअप अतिशय सुंदर दिसेल.
त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे -
जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा चेहरा मेकअप केल्यानंतर सुंदर दिसायला हवा आणि लावलेल ब्लश तुमच्यावर सूट करेल तर, तुमच्या त्वचेची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडू नका. यासाठी त्वचेला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही फेस ओईल, शीटमास्क आणि फेस सिरमचा वापर करू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.