भांड्यांमधून येणारा कांदा-लसणाचा वास कसा काढाल ?

लसूण- कांद्याच्या वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो.
Kitchen tips in marathi, kitchen hacks, Kitchen tips and tricks in Marathi
Kitchen tips in marathi, kitchen hacks, Kitchen tips and tricks in Marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कांदा-लसणामुळे जेवणाची चव वाढते. तसेच आपले आरोग्य देखील सुधारते. घरातील अनेक चविष्ट जेवण बनवल्यानंतर आपल्याला त्रास होतो तो त्यातून येणाऱ्या उग्र वासाचा. (Kitchen tips and tricks in Marathi)

हे देखील पहा -

लसूण- कांद्याच्या वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जात असला तरी, भांड्यातून येणारा वास आपल्या अडचणीचे कारण ठरते. काही वेळेस भांड्यांमधून येणारा हा वास इतका तीव्र असतो की, ती भांडी पुन्हा वापरायची इच्छा होत नाही. जर आपल्या देखील भांड्यातून असा वास येत असेल तर आज आपण काही घरगुती उपाय करणार आहोत. (how to get rid onion garlic smell from utensil)

भांड्यांमधून येणारा कांदा-लसणाचा वास दूर करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

१. घरातील भांड्यांमधून कांद्या- लसणाचा वास येत असेल तर, यासाठी भांडी धुताना डिटर्जंटसोबत मीठाचा वापर करा. भांडी घासल्यानंतर थोडा वेळ तसेच ठेवून स्वच्छ (Clean) पाण्याने (Water) धुवा. असे केल्याने वास निघून जाण्यास मदत होईल.

Kitchen tips in marathi, kitchen hacks, Kitchen tips and tricks in Marathi
Self care tips : स्वत:ची काळजी घेताना या चुका टाळा

२. लसूण-कांद्याचा वास स्टीलच्या भांड्यातून सहज निघतो याउलट काचेच्या आणि प्लास्टिकच्या भांड्यातून निघत नाही. लसूण-कांद्यामध्ये असलेले सल्फर स्टीलच्या भांड्यांशी विक्रिया करून त्याचा वास काही वेळातच नाहीसा करते. त्यासाठी काचेच्या (Glass) किंवा प्लास्टिकच्या भांड्यांऐवजी स्टीलच्या भांड्याच्या उपयोग करावा.

३. भांड्यांमधून लसूण-कांद्याचा वास दूर करण्यासाठी भांडी धुताना लिंबाचा रस वापरावा. भांड्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून घासावे व काही वेळ तसेच राहू द्यावे. यामुळे भांड्यातील वास सहज निघून जाईल.

४. तसेच भांड्यातील वास दूर करण्यासाठी आपण सफरचंदचा व्हिनेगर वापरू शकता. व्हिनेगरचे काही थेंब भांड्यात टाकून काही वेळ राहू द्या. यानंतर भांडी नीट धुवा यामुळे भांड्यातून येणारा वास काही मिनिटांत निघून जाईल.

५. आपण ग्रेव्ही बनवल्यानंतर हात आणि भांड्यांमध्ये येणारा लसूण-कांद्याचा वास दूर करण्यासाठी टूथपेस्टचा वापर देखील करु शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com