Guava Chutney Recipe : कच्च्या पेरुपासून बनवा आंबट-गोड चटणी, एकदा खाल तर म्हणाल वाह!

Peru Chi Chutney : आम्ही तुम्हाला पेरुची मसालेदार आंबट गोड चटणी सांगणार आहोत. पाहूया रेसिपी.
Guava Chutney Recipe
Guava Chutney RecipeSaam Tv

How To Make Guava Chutney At Home :

ताटच्या डाव्या बाजूला वाढला जाणारा पदार्थ म्हणजे चटणी किंवा कोशिंबीर. जेवताना तोंडी लावता येणारा आंबट-गोड पदार्थ म्हणून चटणीला ओळखले जाते. चटपटीत चटणी म्हटलं की, आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही.

भजी, वडे, चाट किंवा इतर तळणीच्या पदार्थांसोबत चटणीही ताटात वाढली जाते. सध्या पावसाळा ऋतू सुरु असल्यामुळे आपल्याला चमचमीत, मसालेदार आणि आंबट-गोड पदार्थ खावेसे वाटतात. चटणी हा भारतीय जेवणाताला महत्त्वाचा पदार्थ आहे. अनेकदा बाजारात आपल्याला पेरु पाहयाला मिळतात.

Guava Chutney Recipe
Shravan Special Recipe 2023 : शेवटच्या श्रावणी सोमवारी बनवा 'प्रसादाचा शिरा', कापसासारखा मऊ होईल; पाहा रेसिपी

पाहाताच क्षणी आपल्याला तोंडाला पाणी सुटते. अशावेळी आपण घरी आणतो. परंतु, बरेचदा घरी आणलेले पेरु हे कच्चे असतात. त्यावेळी नेमके काय करायचे हे आपल्याला समजत नाही. पण आज आम्ही तुम्हाला पेरुची मसालेदार आंबट गोड चटणी (Chutney) सांगणार आहोत. पाहूया रेसिपी.

1. साहित्य

 • २-३ मोठे पेरू

 • ५-७ हिरव्या मिरच्या

 • चवीनुसार मीठ

 • 1 टीस्पून लिंबाचा रस

 • १/४ कप पुदिन्याची पाने

 • १/२ टीस्पून आले (Ginger)

 • १/२ टीस्पून जिरे

 • १/२ टीस्पून साखर (Sugar)

Guava Chutney Recipe
Smart and Intelligent Women : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?

2. कृती

 • पहिल्यांदा पेरु धुवून स्वच्छ करा. त्याचे तुकडे करुन चांगले भाजून घ्या.

 • भाजलेल्या पेरुला बाऊलमध्ये घेऊन त्यावर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे ठेवा.

 • त्यानंतर पेरुची साल काढून घ्या. नंतर पेरुला मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात पुदिना, आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, काळ मीठ, लिंबाचा रस, पाणी, जिरे घाला.

 • मिश्रणात गरजेनुसार पाणी घाला आणि पुन्हा बारीक करा.

 • तयार पेरुची चटणी गाळून घ्या. आता चटणी एअर टाईट बरणीत ठेवा. तयार आहे. गोड आणि आंबट पेरूची चटणी.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com