Moong Daal Halwa Recipe : पचायला हलका व चविष्ट असा मुग डाळीचा हलवा !

आरोग्यासाठी अनेक गोष्टी जितक्या चांगल्या आहेत तितक्याच वाईट. मुगाची डाळ ही आपण कधीतरी खातो.
Moong Daal Halwa Recipe
Moong Daal Halwa RecipeSaam Tv

Moong Daal Halwa Recipe : आरोग्यासाठी अनेक गोष्टी जितक्या चांगल्या आहेत तितक्याच वाईट. मुगाची डाळ ही आपण कधीतरी खातो. हल्ली त्याचेही अनेक प्रकार आहेत. तळलेली, भाजलेली, भातासोबत खाल्ली जाणारी किंवा तिच्यापासून बनवला जाणारा गोडाचा पदार्थ.

आपल्या घरात आनंदाच्या प्रसंगी आपण गोडाचा पदार्थ हमखास बनतो. मूगाची खीर ही दाक्षिणात्य भागात प्रसिध्द आहे. परंतु, मुगाचा हलवा हा देखील तितकाच प्रसिध्द आहे. मुगाच्या डाळी ही पचायला हलकी असल्यामुळे तिला आजारपणात खाल्ले जाते. सूप, मुगडाळीचे वरण आणि भात हा फायदेशीर ठरतो.

परंतु, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना मुग डाळीचा हलवा बनवता येत नाही जाणून घेऊया तो बनवण्याची योग्य पध्दत

Moong Daal Halwa Recipe
Ganesh Festival Recipe : बाप्पासारखी मुलांची बुध्दी तल्लख करायची आहे, बनवा बदामाचा हलवा

साहित्य -

मूग डाळ, मावा, साखर, तूप, वेलची, बेदाणे, काजू, बदाम आणि पिस्ता

कृती -

- मूग डाळ धुवून किमान ३ तास भिजत ठेवा. त्यानंतर मूग बारीक वाटून घ्या आणि कढईत तूप घालून मूग तळून घ्या. यानंतर मावा भाजण्याची पाळी आहे, यासाठी कढईत तूप गरम करून त्यात मावा टाकून तळून घ्या, नंतर भाजलेली मूग आणि मावा दोन्ही एकत्र करून घ्या.

Moong Daal Halwa Recipe
Instant Snack Recipe : पाहुण्यांसाठी मसालेदार स्वीट कॉर्न चाट चा करा बेत, पहा रेसिपी

- साखरेचा (Sugar) पाक बनवण्यासाठी, पॅनमध्ये साखर आणि पाणी (Water) घाला आणि ते विरघळेपर्यंत थांबा, जेव्हा हे दोन्ही व्यवस्थित मिसळले, तेव्हा समजून घ्या की आता साखरेचा पाक तयार आहे.

- त्यात भाजलेली मूग आणि मावा घालून सतत ढवळत असताना शिजवा आणि नंतर त्यात सर्व ड्रायफ्रुट्स बारीक चिरून घ्या. याशिवाय त्यात वेलची पावडर टाकून सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा. खीर घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. हलवा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com