Easy Dessert Recipe : या सोप्या पध्दतीने बनवा रसमलईची रेसिपी, तोंडात टाकताच विरघळेल !

भारतात मोठ्या प्रमाणात दुधाचे गोड पदार्थ काही विशेष प्रसंगी केले जातात.
Easy Dessert Recipes
Easy Dessert RecipesSaam Tv

Easy Dessert Recipe : भारतात मोठ्या प्रमाणात दुधाचे गोड पदार्थ काही विशेष प्रसंगी केले जातात. दुधापासुन पेढे, बर्फी, आईस्क्रिम, पनीर, केक, खीर, रसमलाई आदी खाद्यपदार्थ बनवता येतात. तसेच रसमलाई म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटते.

खायला खूप चवदार आणि स्पर्श करण्यासाठी मऊ अगदी स्पंज सारखीचं, ही एक बंगाली डीश आहे. ज्यामध्ये फाटलेल्या दुधाचे (Milk) गोळे बनवले जातात आणि केशराच्या दुधात बुडवले जातात.

Easy Dessert Recipes
Veg Momos Recipe : फास्ट फूडचे शौकीन आहात ! तर या प्रकारचे मोमोज ट्राय करुन पहा

रसमलई बनवताना ती बरेचा फाटते किंवा ती व्यवस्थितरित्या बनत नाही. त्यासाठी प्रमाण किती असायला हवे हे जाणून घ्या.

साहित्य -

रिठा (दुधाला फेस येण्यास मदत होते), दूध, साखर, व्हिनेगर, कॉर्नफ्लोअर, मैदा, केशर, पिस्ते, बदाम आणि रबडी

कृती -

- रसमलाई बनवण्यासाठी, प्रथम रिठा कापून घ्या, नंतर सर्व बिया स्वच्छ करा आणि सोलून घ्या पाणी गरम करून त्यात सोललेली रिठा भिजवा.

Easy Dessert Recipes
Recipe : पौष्टिक व खमंग थालीपीठाची चव चाखायची आहे तर, आजच ट्राय करुन पहा

- आता दुसऱ्या भांड्यात पिस्ता आणि बदाम टाकून कुसकरुन घ्या. त्यानंतर ते थंड झाल्यावर त्यांची कातडी काढून पातळ कापून ठेवा.

- कढईत पाणी आणि साखर (Sugar) वापरून पाक बनवा.

- दूध उकळून थंड होऊ द्या, दूध थंड झाल्यावर त्यात व्हिनेगर घालून व्यवस्थित मिसळा. दूध फुटल्यानंतर त्यात थंड पाणी टाकून सर्व दूध कापडाने गाळून दुसऱ्या भांड्यात ठेवावे व हळूहळू पाणी पिळून वेगळे करावे.

Easy Dessert Recipes
Matar Kulche Recipe : दिल्ली स्टाइलचे मटर कुल्चे बनवायचे आहे तर, आजच ट्राय करा

- आता त्यात मैदा आणि कॉर्न फ्लोअर मिक्स करून त्याचे पीठ तयार करा, नंतर त्याचे छोटे गोळे करा.

- दुसरीकडे एका पातेल्यात साखर आणि एक वाटी पाणी टाकून साखरेचा पाक बनवा, हा पाक पूर्वीसारखा घट्ट राहील.

- पाक उकळायला लागल्यावर त्यात थोडे तयार रिठाचे पाणी आणि सर्व गोळे आरामात टाका. फेस यायला लागल्यावर रसमलाई हलकी दाबा आणि थोड्या वेळाने त्यात उकळलेले पाणी घाला.

Easy Dessert Recipes
Simple Veg Pulao Recipe : व्हेज पुलाव बनवायचा आहे तर, या साध्या पध्दतीने बनवा

- सर्व फेस जमल्यावर रसमलाई आधी तयार केलेल्या पाकात टाका आणि थोडा वेळ भिजवू द्या.

- आता एका कढईत दूध गरम करून त्यात केशर टाका आणि रसमलाई पाकातून काढून केशर दुधात टाका आणि चांगले भिजवा. नंतर एका प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com