घरच्या घरी असा बनवा सोया चाप मसाला

सोया चाप मसाला बनवण्यासाठी या टिप्स फॉलो करा
how to make soya chap masala
how to make soya chap masalaब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हॉटेलमध्ये किंवा बाहेर खाल्ले पदार्थ आपल्याला कधी कधी घरी बनवण्याची हौस असते. कधी ती रेसीपी बनते किंवा कधी ती फसते.

हे देखील पहा-

सोया चाप हा सोयाबीनची रेसीपी बनवताना वापरला जातो व त्याला रुमाली रोटी किंवा भातासोबत खाल्ले जाते. या मसाल्याला भारतातच नाही तर परदेशातही चवीने खाल्ले जाते. व्हेज-नॉन व्हेजच्या कोणत्याही पदार्थात या मसाल्याचा वापर केला जातो. हा मसाला घरच्या घरी कशा पध्दतीने बनवाल आपण हे पाहूया.

साहित्य

लवंग - १ छोटा चमचा

आले पावडर - १ छोटा चमचा

काळी मिरी - ५

तमालपत्र - ३

हळद (Turmeric) पावडर - १ छोटा चमचा

पांढरे खसखस ​​- १ छोटा चमचा

वेलची - १२

जायफळ - १ छोटा चमचा

दालचिनी- २

कांदा पावडर - १ छोटा चमचा

लाल तिखट - १ छोटा चमचा

केशर - चिमूटभर

लसूण पावडर - १ छोटा चमचा

जिरे - १ छोटा चमचा

काजू - १०

लाल रंग - चिमूटभर

तळण्यासाठी तेल (Oil)

how to make soya chap masala
या रेसिपीने ब्रेकफास्टला द्या फ्युजनचा तडका !

कृती -

१. सर्वप्रथम मसाले स्वच्छ करुन त्यांना उन्हात सुकवून घ्या

२. दुसऱ्या दिवशी कढईत तेल घेऊन लवंग, तमालपत्र, जिरे व वेलची घालून चांगले तळून घ्या.

३. दुसऱ्या पॅनमध्ये काजू व पांढरी खसखस तळून घ्या.

४. तळलेले सर्व साहित्य थंड होऊ द्या.

५. तळलेले मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या आणि एका भांड्यात काढा.

सोया चाप मसाला कसा साठवाल

सोया चाप मसाला हा इतर मसाल्यांसारखाच असतो तो अनेक दिवस सहज साठवू आपण ठेवू शकतो. सोया चाप मसाला साठवण्यासाठी आपण काचेच्या बरणीत किंवा हवाबंद कंटेनचा वापर करु शकतो. हा मसाला वापरताना त्याचे झाकण व्यवस्थित बंद करा. तसेच हा मसाला आपण प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करूनही साठवू शकतो. यामुळे मसाला अधिक सुरक्षित राहिल. आपण हा मसाला इतर पाककृतींसाठी किंवा ग्रेव्ही भाज्यांमध्ये देखील वापरू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com