Veg Momos Recipe: फास्ट फूडचे शौकीन आहात ! तर या प्रकारचे मोमोज ट्राय करुन पहा

Veg Momos Recipe: भारतातील लोकांना आवडणाऱ्या उकडीच्या मोदकाचे वेगळे रुप म्हणजे मोमोज.
Veg Momos Recipe
Veg Momos RecipeSaam Tv

Veg Momos Recipe:

भारतातील लोकांना आवडणाऱ्या उकडीच्या मोदकाचे वेगळे रुप म्हणजे मोमोज. आपण सध्या पाहिले असेल की मोमोज आणि उकडीचे मोदक यात बराचसा फरक असला तरी आपण सोशल मीडियावर यातला वॉर पाहिला असेलच ऐकीकडे मोमोज आणि ऐकीकडे उकडीचे मोदक अशा दोन गटांमध्ये नेहमीच उकडीचे मोदक अव्वल ठरतात यात काय प्रश्नच नाही.

मोमोज दोन प्रकारचे बनवले जातात. वेज आणि नॉन-वेज अशाच पध्दतीचे मोमोज आता वेगवेगळ्या प्रकारे बनवण्याचा सध्या ट्रेंड आला आहे.

Veg Momos Recipe
Ganpati Festival Recipe : गणरायाला सर्वात प्रिय असा पंचकजाया, झटपट बनेल !

मोमोज हा तिबेटीयन पदार्थ असून नेपाल, सिक्कीम, दार्जिलिंग या भागांमध्ये बनवला जातो. मोमो या पदार्थाचे नाव चिनी शब्द मोमो ( steamed bread) वरून प्राप्त झाले आहे. या पदार्थाचे नाव ऐकले की आपल्याला हा पदार्थ चायनीज आहे असे वाटते. मोमोज हे अतिशय प्रसिद्ध भारतीय स्ट्रीट फूड बनले आहे. आजच्या तरुणाईमध्ये खूप क्रेझ असलेला लाल मसालेदार चटणीसोबत मस्त लागतो. चला तर मग पाहुयात ही रेसिपी. (Street Style Momos Recipe )

साहित्य - मैद्याचे पीठ, सारण बनवण्यासाठी तेल (Oil), लसूण, गाजर, आले, मिरची, कांद्याची पात, कोबी, काळी मिरी आणि मीठ

कृती -

सर्व प्रथम आपण त्याचे पीठ तयार करू. यासाठी एका भांड्यात मैदा आणि मीठ घेऊन त्यात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. पीठ मऊ करण्याचा प्रयत्न करा. नंतर पीठ तेलाने ग्रीस करा आणि ३० मिनिटे बाजूला ठेवा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, गाजर, आले, मिरची, कांद्याची (Onion) पात घाला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोबी घालावी. नंतर हे सर्व मंद आचेवर ठेवून त्यात काळी मिरी आणि मीठ घाला.

Veg Momos Recipe
Diabetes rising among kids : मुलांना सतत गोड खावेसे वाटते ? तुमच्या मुलांना हा आजार तर नाही ना, जाणून घ्या

आता सर्व गोष्टी नीट मिक्स करा आणि थोडा वेळ थंड होणयास ठेवा. आता मोमोजची स्टफिंग तयार आहे. ३० मिनिटांनंतर, मोमोजचे पीठ पुन्हा घ्या आणि पुन्हा मळून घ्या. आता पिठाचा छोटा गोळा लाटून घ्या. रोलिंग केल्यानंतर, त्यात स्टफिंग ठेवा आणि मोमोज वरच्या बाजूला एक बंडल बनवा. अशा प्रकारे सर्व मोमोज तयार करा आणि नंतर स्टीमर गरम करा आणि त्यात मोमोज १०-१२ मिनिटे ते चमकेपर्यंत वाफवून घ्या, आणि चटणी सोबत सर्व्ह करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com