घरच्या घरी अशी बनवा कच्च्या कैरीपासून टेस्टी आइस्क्रीम

आईस्क्रीम बनवायचे असेल तर कच्च्या कैरीचे चविष्ट आइस्क्रीम करून पहा.
how to make ice cream at home, ice cream Recipe in Marathi, kacchi kairi ice cream, raw mango recipes in marathi
how to make ice cream at home, ice cream Recipe in Marathi, kacchi kairi ice cream, raw mango recipes in marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फळांचा राजा आंबा आहे असे म्हणायला हरकत नाही. उन्हाळा म्हटलं की, बाजारात सर्वत्र दिसतो तो आंबा (Mango) पण, त्याही आधी दिसते ती सगळ्याची लाडकी कैरी. चवीला अगदी आंबट-गोड. कैरीचे लोणची, कैरी मसाला, चटणी, कैरीचे पन्ह आणि कैरी मुरंबा असे अनेक पदार्थ आपण उन्हाळ्यात चाखत असतो व आपल्या जिभेची चव वाढवत असतो. उन्हाळ्यात आपल्या शरीराला अधिक प्रमाणात थंड पेयांची गरज असते. अशावेळी आपण आइस्क्रीम चाखली नाही तर नवलच ! उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्याची एक वेगळीच मजा असते. आपल्यापैकी अनेकांना घरी आईस्क्रीम बनवून खायला आवडते. त्यासाठी आज आपण कच्च्या कैरीचे आंबट- गोड आइस्क्रीम कसे बनवायचे ते पाहणार आहोत. (How to make ice cream at home)

हे देखील पहा-

कसे बनवायचे कच्च्या कैरीपासून आइस्क्रिम

साहित्य

कच्च्या कैरीचा प्लप - ४ कप

दूध (Milk) - १ लिटर

फ्रेश क्रीम - १/२ कप

साखर (Sugar) - १/४ कप

बदाम पावडर - १ छोटा चमचा

हिरवा रंग - १ चिमूटभर (ऐच्छिक)

मावा - २ चमचे

ड्रायफ्रुट्स आवश्यकतेनुसार

how to make ice cream at home, ice cream Recipe in Marathi, kacchi kairi ice cream, raw mango recipes in marathi
मधल्यावेळेत भूक लागल्यावर या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा!

कृती -

कच्च्या कैरीचे आइस्क्रीम घरी बनवण्यासाठी कैरीचा पल्प आणि साखर मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट बनवा आणि एका भांड्यात काढा. दुसरीकडे पातेल्यात दूध गरम करून घ्या. त्यानंतर दूध गरम झाल्यावर त्यात कैरीची पेस्ट घाला आणि साधारण ५ मिनिटे ढवळत राहा. ५ मिनिटांनंतर दुधात फ्रेश क्रिम, बदाम पावडर, हिरवा रंग, मावा आणि ड्रायफ्रुट्स घालून चांगले मिक्स करा.

सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर साधारण ५ मिनिटे पुन्हा शिजवून घ्या आणि मग गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर आइस्क्रीमच्या स्लॉटमध्ये मिश्रण चांगले भरा.

यानंतर, हे मिश्रण डीप फ्रीजरमध्ये २ तास सेट होण्यास ठेवा. २ तासांनंतर कैरीचे आंबट- गोड आइस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे.

अशाप्रकारे बनवा कैरीपासून आंबट- गोड आइस्क्रीम.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com