विखुरलेल्या वॉर्डरोबचे असे करा, व्यवस्थित व्यवस्थापन!

घरातील वॉर्डरोब व्यवस्थित ठेवल्यास दररोजच्या वापरातील कपड्यांपासून इतर गोष्टी सहज मिळतात आणि वेळेचीही बचत होते.
विखुरलेल्या वॉर्डरोबचे असे करा, व्यवस्थित व्यवस्थापन!
How to manage your wardrobeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अव्यवस्थित गोष्टी कोणालाच आवडत नाहीत आणि घरातील वॉर्डरोबबद्दल बोलायचे झाले तर, अस्ताव्यस्त वॉर्डरोब अनेकदा गृहिणीच्या अडचणी वाढवतो. वेळेअभावी किंवा आळशीपणामुळे आपण आपले वॉर्डरोब व्यवस्थित ठेवू शकत नाहीत. त्यामुळे घाईगडबडीत किंवा गरजेच्या वेळी आवश्‍यक वस्तू आपल्याला मिळत नाहीत, परंतु घरातील वॉर्डरोब व्यवस्थित ठेवल्यास दररोजच्या वापरातील कपड्यांपासून इतर गोष्टी सहज मिळतात आणि वेळेचीही बचत होते. सुट्टीच्या दिवशी किंवा कामातून वेळ (Time) मिळाल्यानंतर आपण आपले वॉर्डरोब कसे नीट लावू शकतो या विषयी काही खास टिप्स (Tips).

हे देखील पहा -

वॉर्डरोबमध्ये अशाप्रकारे ठेवा आपले कपडे

१. अनेकदा आपण आपले कपडे वेळेअभावी असेच कोंबून ठेवतो. कपडे कपाटात कोंबून ठेवल्याशिवाय ते कपाटात बसत नाहीत, त्यामुळे कपडे प्रेस करुन प्लॅस्टिकच्या पिशवीत फोल्ड करून कपाटात ठेवावेत. ज्यामुळे पुढच्या वेळी आपल्याला शोधताना घाई होणार नाही.

२. कपाटात कपडे ठेवण्यासाठी, आपण सर्वात आधी वर्तमानपत्रे कपाटात ठेवणे आवश्यक आहे. मग त्यावर कपडे घाला. तसेच कपाटात थोडेसे ओले कपडेही ठेवणे टाळा. हलके ओले कपडे कपाटात ठेवल्याने दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे कपाटात कपडे ठेवताना ते व्यवस्थित वाळले आहेत याची खात्री करा.

How to manage your wardrobe
Home Cleaning Tips : घरामध्ये साचलेल्या धुळीपासून अशी मिळवा सुटका !

३. आपले बरेच कपडे संपूर्ण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कपाटात ठेवलेले असतात. त्यामुळे अशा ऋतूत कपडे व्यवस्थित वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असल्यास महिन्यातून एकदा सूर्यप्रकाश दाखवा.

४. आपण वॉर्डरोब रोज वापरतो पण काही कारणानिमित्त आपल्याला काही दिवसांसाठी घराबाहेर जायचे असेल तर, कपाटात नॅप्थालीनच्या गोळ्या ठेवाव्यात. आपले वॉर्डरोब काही दिवस बंद जरी राहिले तरी आपल्या कपड्यांना वास येणार नाही.

५. आपली घड्याळे, दागिने (Gold), परफ्यूम, जेल आणि लोशन ठेवण्यासाठी आपण आपल्या कपाटात लहान बॉक्सचा वापर करु शकतो. असे केल्याने आपल्याला इतर कपाटात काही अतिरिक्त जागा मिळेल.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या वॉर्डरोबचे व्यवस्थापन करू शकता.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.