
मुलांचे वय वाढू लागले की, पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावू लागते. वाढती महागाई, शिक्षणांचा खर्च आणि करिअर याचा योग्यप्रकारे नियोजन करणे जमत नाही. परंतु, पालकांनी मुलांच्या योग्य वयात गुंतवणूक केल्यास भविष्याच पैशांची चिंता कधीच सतावणार नाही.
मुलांच्या भविष्यासाठी काही सरकारी योजना, बँक किंवा पीपीएफ खात्यात अनेक सुविधा दिल्या जातात. मुलांच्या भविष्यासाठी अनेक वेगवेगळे गुंतवणूकीचे पर्याय आहे. त्यातील एक पीपीएफ. आज आम्ही तुम्हाला मुलांसाठी पीपीएफ खाते कसे उघडायचे ? त्याचे फायदे काय आहेत? मुलांच्या पीपीएफ खात्यात पैसे जमा आणि काढण्याचे नियम कोणते आहेत? याविषयी माहिती देणार आहोत.
मुलांसाठी पीपीएफ खाते कसे उघडायचे?
बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पीपीएफ खाते उघडू शकता. यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म मिळतो. काही बँका किंवा पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर हा फॉर्म उपलब्ध आहे. तुम्ही तो डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढून फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करु शकता.
फोटो आणि ओळखपत्र
मुलाचे पीपीएफ खाते उघडण्यासाठी त्याच्या पालकांचा पासपोर्ट फोटो आणि केवायसी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज ,केवायसी कागदपत्रांसह मुलाचे वय सिद्ध करणारे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. मुलांचे आधारकार्ड असेल तर ते दाखल करावे. तुमच्याकडे आधारकार्ड नसल्यास, हॉस्पिटलमधून मिळवलेला जन्म दाखला किंवा इतर सरकार मान्यताप्राप्त पुरावा सादर करु शकता.
मुलांसाठी पीपीएफ खाते उघडण्याचे फायदे
मुलांसाठी पीपीएफ योजना उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये आवश्यक गोष्टींची पूर्तता होत नाही. काहींमध्ये परतावा मिळत नाही. तर काही वेळेस परतावा कमी मिळतो. त्याचप्रमाणे काही प्रकरणांमध्ये पैसे जमा करण्याचे नियमही कठोर आहेत. कर सूट पुरेशी मिळत नाही.
भविष्यात करिअरसाठी आर्थिक तरतुद
तुम्ही तुमच्या मुलासाठी या योजनेत गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईन. भविष्यात कधी एकरकमी रक्कम जमा करायची असल्यास ते सहज सोपे आहे. उदाहरणार्थ जर तुमच्या मुलाला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवायचे असेल तर अॅडमिशन फि, कोर्स फि , राहण्याचा खर्च सर्व रक्कम या योजनेतील रक्कमेतून होईन. जर तुमच्या मुलाला भविष्यात कोणता व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठीही तुम्ही पैसे काढू शकता. त्यामुळे मोठ्या रक्कमेची तरतूद तुम्ही करु शकता.
बचत गुंतवणूक, नियोजन करण्याची सवय
जर तुम्ही आता पीपीएफ खाते उघडत असाल तर त्याची मदत तुम्हाला भविष्यात होईल. जसा जसा मुलगा मोठा होईल तसा तो जास्त समजदार होतो. त्यामुळे त्याला हे पैसे कुठे गुंतवायचे याचे ज्ञान आले असेल. यामुळे त्याचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होईल.
पालकांसाठी पैसे काढण्यावर निर्बंध
जर तुम्हाला मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पैसे काढायचे असेल तर १५ वर्षाच्या मॅच्युरिटी स्टेजच्या आधी हे पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला योग्य कागदपत्रे जमा करावी लागेल. या सुविधेचा लाभ तुम्ही खात्याची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच घेऊ शकता. जर मुलाच्या खात्यातून पैसे काढायचे असेल तर ते मुलाच्या उपयोगासाठी असणे गरजेचे आहे.
प्रौध झाल्यावर पैसे काढण्याचे अधिकार मिळतात
मुलाची वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्याचे सर्व अधिकार त्याच्याकडे जातात. त्याच्या नावावर हे खाते ट्रान्सफर होते. म्हणजेच मुलगा स्वतः च्या सहीने खात्यातील पैसे काढू शकतो. खात्याबाबत सर्व निर्णय घेऊ शकते. याआधी हे अधिकार पालकांकडे असतील.
पालकांसाठी फयदा
पीपीएफ खात्यात जमा झालेल्या रक्कमेवर आयकर विभागाच्या कलम ८० सीअंतर्गत सूट मिळते. १.५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास तुम्हाला अतिरिक्त रक्कमेवर व्याज मिळणार नाही. अतिरिक्त रक्कमेवर कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही.
जर मुलाच्या PPF खात्यात जमा केलेली रक्कम त्याच्या पालकांच्या किंवा पालकांच्या कमाईतून असेल, तर पालक किंवा पालक देखील कलम 80C अंतर्गत त्यावर कर सूट घेऊ शकतात.
शिवाय, तुम्ही त्याचे पैसे काढले तरी त्यावर कर आकारला जात नाही. ही सूट मुलाच्या PPF खात्याला तसेच पालकांच्या खात्यावर लागू आहे. जर तुम्ही ५ वर्षांपूर्वी खाते बंद केले तर पैसे काढल्यावर कर कापला जाईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.