Skin Care : उन्हाळ्यात वाढणाऱ्या पिंपल्सच्या समस्यांना अशा पद्धतीने रोखा

मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी अशी घ्या काळजी.
Skin care tips in marathi, summer tips
Skin care tips in marathi, summer tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शरीरात अधिक उष्णता वाढली की, चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. उन्हाळ्यात मुरुमांची समस्या अधिक दिसून येते. चुकीचे खाणे, तणाव, जास्त चहा पिणे अशा अनेक समस्या पिंपल्सचे कारण आहेत. तसेच याशिवाय घाम येणे हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे या समस्या सुरू होतात. घामामुळे चेहऱ्यावर (Skin) घाण चिकटून राहते, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरुम किंवा त्वचेच्या इतर समस्या सुरू होतात. त्यातच आपण सतत घाम पुसत राहतो परंतु, तसे करणे पुरेसे नाही. अनेक वेळा घामात अडकलेली घाण त्वचा शोषून घेते, त्यामुळे ब्लॅकहेड्स किंवा पिंपल्स (Pimples) आपल्या चेहऱ्यावर येतात.

हे देखील पहा -

या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे मुरुम आणि पुरळ किंवा पिंपल्स रॅशची समस्या राहणार नाही.

१. वर्कआउट करून किंवा बाहेरून आल्यानंतर तर लगेच चेहरा साफ करु नका. चेहरा टॉवेलने पुसा, ज्यामुळे घाम निघून जाईल. १० ते १५ मिनिटानंतर आंघोळ करा किंवा चेहरा धुवा. घामाने भिजलेला चेहरा लगेच पाण्याने धुतल्यास उष्माघाताची भीती राहते. अशावेळी चेहरा दुप्पट स्वच्छ (Clean) करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून घाण चांगली निघून जाईल.

Skin care tips in marathi, summer tips
Home decorating ideas: असे इंटीरियर करून घराला द्या घरपण!

२. ब्लॅकहेड्स किंवा पिंपल्ससाठी बऱ्याचदा आपण स्क्रबचा वापर करतो. त्यामुळे ब्लॅकहेड्स देखील सहज दूर करते. बरेच लोक यासाठी बाजारातील उत्पादने वापरतात. उन्हाळ्यात त्वचेतून तेल निघण्याची समस्या खूप असते. अशा स्थितीत घाम आल्यावर त्वचा चिकट दिसते. त्वचेला तेलमुक्त ठेवण्यास मदत करणारे घरगुती पदार्थांचा वापर केल्यास अधिक चांगले होईल. यासाठी ओट्स आणि दह्याचा वापर करु शकता. हे दोन्ही घटक त्वचा स्वच्छ होईल व मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होईल.

३. चेहऱ्यावर वेगवेगळी उत्पादने वापरल्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवत असली तरी काही वेळा लेयरिंगमुळे त्वचेची छिद्रे बंद होतात. इतकच नाही तर, ब्युटी प्रोडक्ट लावल्यानंतर घाम जास्त येऊ लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचा नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच वेळी, अशा उत्पादनांचा वापर करा, जे एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतात. आजकाल सनस्क्रीनमध्ये मॉइश्चरायझर येत आहे, जे वापरण्यासाठी पुरेसे असेल.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com