How To Reach Raigad Fort : शिवराज्याभिषेक दिनी रायगडाची ओढ; शिवप्रेमींना कमी वेळेत किल्ले रायगड गाठण्यासाठीचे पर्याय

How to Reach Raigad Fort by Road : एका दिवसात रायगडावर कसे जाल ? काही तासांत अंतर कसे कापाल ? जाणून घ्या सविस्तर
How To Reach Raigad Fort
How To Reach Raigad FortSaam Tv

Shivrajyabhishek Sohla : ६ जून हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून ओळखला जातो. या दिवशी प्रत्येक मावळ्यासाठी हा दिवस दसरा-दिवाळीच्या सणांसारखाचं. आपल्या लाडक्या राजाला सिंहासनावर बसलेले पाहण्यासाठी असंख्य मावळे रायगडावर कूच करतात.

अनेक सुट्टी किंवा पर्यटनासाठी देखील या ठिकाणी जातात जर तुम्ही देखील उद्याच्या दिवशी रायगडावर जाणार असाल आणि हा प्रवास तुम्हाला एक दिवसात करायचा असेल तर तुम्ही अशाप्रकारे जाऊ शकता.

How To Reach Raigad Fort
Shivrajyabhishek Sohala 2023 : माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं... दिमखात पार पडणार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा !

रायगड (Raigad) किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील, महाड गावात स्थित असून, हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपति शिवाजी महाराज्यांनी बांधलेला ऐतिहासिक किल्ला आहे. 1674 मध्ये राज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक केल्यानंतर महाराजांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी केले होते. 820 मीटर उंचीवर असलेला आणि समुद्रसपाटीपासून 2700 फूट वर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला हा गड आहे.

रायगडाला एकूण 1737 पायऱ्या असून सध्या येथे रोपवेच्या मदतीने फक्त 10 मिनिटांच्या कालावधीत गडावर पोहोचणे शक्य आहे. रायगडावर जाण्यासाठी तुम्हाला पायथ्याशी असलेल्या पाचाड किंवा रायगडवाडी गावात पोहोचणे गरजेचे आहे. गडाचा पायथा हा पाचाड गावात असल्यामुळे तुम्ही इथून आपला गडावर जाण्याचा मार्ग निवडू शकता. पण या गावात पोहोचण्यासाठी कोणता वाहतूक मार्ग निवडावा हे तुमच्यावर अवलंबून आहे. चला तर मग पाहुयात कोण-कोणत्या मार्गाने तुम्हाला रायगडला जाता येईल.

How To Reach Raigad Fort
Place To Visit in Rainy Seasons : पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत बेस्ट !

1. रस्त्याच्या मार्गाने

शासनाच्या काही महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बस रायगडमधील तीन महत्त्वाच्या बस स्थानकांवर थांबतात. त्यात अलिबाग बसस्थानक, पनवेल राज्य परिवहन बस डेपो आणि माणगाव राज्य परिवहन स्टँड यांचा सामावेश होतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, या बसेसने प्रवास करु शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे अनेक खाजगी बसेसचा ही पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमचे तिकीट ऑनलाइन पद्धतीने काढू शकता. अशा प्रकारे तुम्ही आपला आरामदायी प्रवास (Travel) बुक करू शकता.

तुम्ही मुंबईवरून रायगडला जाण्यासाठी NH17ने लोनेरा फाटा, दासगावला पनवेल-महाड मार्गे पोहाचू शकता. गडावर जाण्यासाठी रोपवे सेवा गडाच्या पायथ्यापासून गडाच्या टोकापर्यंत उपलब्ध आहे.

How To Reach Raigad Fort
Camping Travel Tips : कॅम्पिंगला जाण्याचा प्लान करताय ? ट्रेनचा प्रवास ठरेल बेस्ट ! भारतातील या 5 अनएक्प्लोर्ड ठिकाणांना भेट द्या

2. ट्रेन मार्गे.

रेल्वे (Railway) मार्गाने मुंबई आणि पुण्याला जोडलेले सर्वात जवळचे वीर रेल्वेस्थानक रायगडापासून 40 किमी अंतरावर आहे. तुम्ही रेल्वेस्थानका बाहेरुन टॅक्सी करून रायगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकता. मग वाट कसली बघताय आजच बस, ट्रेन किंवा फ्लाईट बूक करा आणि उंच कड्यावर असणाऱ्या राजेशाही रायगडाची सफर करा.

3. हवाई मार्गे

हवाई मार्गाने प्रवास करायचा झाल्यास सर्वात जवळ असलेला हावाई मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आहे. हा एअरपोर्ट रागयगडपासून 140 किमी अंतरावर आहे. या विमानतळावरुन सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असतात. रायगडपासून दुसरा सर्वात जवळ असलेला हवाई मार्ग पुण्याला आहे. जो रायगडापासून 126 किमी अंतरावर आहे आणि अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडलेला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com