कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर हे करुन पहा, मिळेल लवकर आराम
Corona positive, Covid-19ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर हे करुन पहा, मिळेल लवकर आराम

कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर स्वत:ची काळजी कशी घ्याल?

मुंबई : मागच्या दोन वर्षाच्या काळात कोरोनाने आपले थैमान घातले आहे. सध्या कोरोनाचे केसेस कमी झाल्याने परिस्थिती आधी सारखी करण्यात आली आहे परंतु, पुन्हा कोरोनाने आपले डोकेवर काढण्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखील पहा -

अचानक सर्दी, ताप व खोकला झाल्यानंतर आपल्याला भिती वाटू लागते. आपल्याला कोरोना तर झाला नाही ना हा विचार आधी आपल्या डोक्यात येतो. परंतु, याचे कारण बदलेले वातावरण किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील असू शकतात. तरी देखील आपल्याला कोरोनाची लक्षण जाणवत असतील तर अशावेळी आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया.

१. कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर किंवा त्याची लक्षणे आपल्याला दिसल्यानंतर आपण आपल्या कुटुंबापासून लांब राहायला हवे. आपण किंवा घरातील इतर सदस्यांनी लस घेतली असेल तरी आपण आपल्यात अंतर राखायला हवे.

Corona positive, Covid-19
२ मिनिटात गाढ झोप येण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करुन बघा

२. आपल्याला कोरोनाची लक्षणे दिसत असतील परंतु आपण त्याची चाचणी केली नसेल तर सर्वात आधी त्याची चाचणी करा. त्या चाचणीचा निकाल येईपर्यंत स्वत:ला इतरांपासून लांब ठेवा.

३. आपली चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तींना हे कळवा. हा आजार संसर्गजन्य रोगासारखा आहे. त्यामुळे आपल्यासोबत इतर लोकांनादेखील त्याची लागण होऊ शकते.

४. कोरोनाची लक्षणे अधिक गंभीर दिसत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामध्ये सतत डोकेदुखी, कोरडा खोकला, ताप येणे, थकवा व घसा दुखणे यांसारख्या समस्या दिसून येतात. जरी ही लक्षणे सामान्य दिसत असली तरी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

५. कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर किंवा तशी लक्षणे दिसल्यानंतर आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायला हवी. त्यासाठी काढा, जीवनसत्त्व (Vitamins) वाढवणारे घटक व व्यायाम आदी करावा. फळांचे (Fruit) व हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com