
मुंबई: दिसायला अगदी मेथी सारखी असणारी घोळची भाजी. घोळ या भाजीला मोठी घोळ, भुईगोळी, कुरफा अशी स्थानिक नावे मिळालेली आहे. मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी घोळच्या दुस-या प्रजातीचे उत्पन्न होते. या भाजीमुळे शरीरातील उष्णता कमी होते. घोळीच्या भाजीत अनेक पोषक घटक, जीवनसत्त्वे (vitamins), खनिजे व फायबर्स अधिक प्रमाणात मिळतात. या भाजीत कोलेस्ट्रॉल व कॅलरीज अत्यंत कमी प्रमाणात असतात. घोळीच्या पानांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आढळते व हृदयविकारापासून दूर ठेवण्यासाठी मदत होते. या भाजीचा उपयोग कसा होतो हे पाहूया.
हे देखील पहा-
⦁ घोळ व लहान घोळ मूळव्याधीवर गुणकारी असून ते उत्तम औषध आहे.
⦁ या भाजीमुळे अल्सर होत नाही ही भाजी थंड असते.
⦁ घोळभाजीत कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियमसारखी खनिजे आढळतात.
⦁ यात अ जीवनसत्त्व असते. या भाजीच्या सेवनाने शरीरातील वाढलेला कफ व पित्तदोष कमी होतो तसेच आतड्यांची हालचाल वाढून पोट साफ होते.
⦁ उन्हाळ्यात हातापायांची, डोळ्यांची होणारी जळजळ या भाजीने कमी होते.
⦁ या भाजीत तांब्याचे व लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते.
⦁ या भाजीचे आहारात सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
⦁ या भाजीचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मुतखडा होण्याची शक्यता असते.
अशी बनवा घोळीची भाजी
साहित्य : २ मोठे कांदे, १ टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, अर्धा कप बेसन, चवीपुरता चिंचेचा कोळ, आवश्यकतेनुसार तेल, मोहरी, तिखट, मीठ, हळद व कोथिंबीर .
कृती : सर्वप्रथम प्रत्येकी वेगवेगळे घोळीची पाने, कांदा (onion) व टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी चिरलेला कांदा व टोमॅटो घालून लालसर होऊ द्या. त्यानंतर त्यात आलं-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद (turmeric) व घोळीची पाने चांगले परतून घ्या. घोळीची पाने शिजल्यानंतर २ चमचे बेसन घाला. काही वेळा नंतर वरून चिंचेचा कोळ व कोथिंबीर घाला.
डिस्क्लेमर: या भाजीचा आहारात समावेश करताना कृपया त्याची योग्य ती खात्री करावी.
Edited By - Komal Damudre
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.