मिक्सरची काळजी कशी घेता येईल ?

पूर्वीच्या काळी मसाला वाटण्यासाठी पाटकणाचा वापर केला जायचा.
मिक्सरची काळजी कशी घेता येईल ?
Kitchen tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पूर्वीच्या काळी मसाला वाटण्यासाठी पाटकणाचा वापर केला जायचा. बदलत्या जीवनशैलीनुसार हल्ली मिक्सरचा वापर सहज केला जातो.

हे देखील पहा -

सध्या आपल्याला सर्वत्र अत्याधुनिक व गरजेच्या वस्तू पाहायला मिळतात. आपल्या स्वयंपाकघरातील (Kitchen) महत्त्वाची वस्तू मिक्सर. मिक्सरमधे आपण मसाला वाटतो परंतु त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. त्याची स्वच्छता राखणे देखील आवश्यक आहे. त्याची काळजी कशी घ्याल हे जाणून घेऊया.

१. मिक्सर सुरू करण्यापूर्वी त्याचे खिळे प्रथम तपासून घ्यावेत. कारण ते खिळे निखळून पडल्यास मिक्सरच्या भांड्यातील पाती गळून पडतात.

२. कोणताही गरम पदार्थ मिक्सरमध्ये वाटायला घेऊ नये. तो थंड करुन मगच मिक्सरमध्ये वाटावा. मिक्सर एकदम जलद गतीवर फिरत असताना तो सुरू अथवा बंद करू नये. त्यामुळे मिक्सरच्या मोटारीवर प्रेशर येते. सुरुवातीला हळू, मग मध्यम आणि शेवटी जलद गतीनेच मिक्सर फिरवावा.

Kitchen tips
अॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न स्टोअर करणे ठरते धोकादायक

३. मिक्सर सुरू केल्यावर भांड्याच्या झाकणावर नेहमी हात ठेवावा. मिक्सरच्या भांड्यात वरपर्यंत कोणताच पदार्थ तुडुंब भरू नये. तसे केल्याने मिक्सरच्या मोटारीवर ताण येतो.

४. काम झाल्यावर लगेचच मिक्सरची पीन प्लगमधून बाजूला करावी. तसे न केल्यास विद्युतप्रवाह सुरूच राहतो. त्यामुळे मिक्सरला इजा पोहोचते.

५. चटणी, वाटणं किंवा अन्य कोणतेही चिकट, घट्ट पदार्थ मिक्सरमध्ये आपण वाटत असतो, तेव्हा काम झाले की, भांड्यात थोडं पाणी घालून मिक्सर पुन्हा फिरवावा. जेणेकरून पातीला चिकटलेले पदार्थ निघतील आणि मिक्सरचं भांडं स्वच्छ होईल.

६. मिक्सरवर तासाभराचं काम असेल, तर मधे मधे त्याला थोडीशी विश्रांती द्या. काही वेळासाठी मिक्सर बंद करावा. कारण तासभर सलग चालवल्याने मिक्सरच्या मशीनवर परिणाम होतो.

७. कोरड्या आणि स्वच्छ (Clean) ठिकाणीच मिक्सर ठेवावा. काम झाल्यावर मिक्सर नेहमी ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यावा. ज्या ठिकाणी भांडं ठेवतो तो भाग तसंच भांड्याखालचा रबरी भाग प्रथम ओल्या फडक्याने नंतर कोरड्या फडक्याने पुसून घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com