Health issue, diabetes problem
Health issue, diabetes problem ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फादर्स डे स्पेशल : मधुमेहग्रस्त बाबाची अशी घ्या काळजी

मधुमेह हा आजार गंभीर असून त्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

मुंबई : आपल्या भारतात मधुमेह या आजारांशी लढणारी संख्या अधिक आहे. मधुमेह हा आजार गंभीर असून त्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

हे देखील पहा -

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या संशोधनानुसार महिलांच्‍या (१.४ टक्‍के) तुलनेत पुरूषांमध्‍ये (२.३ टक्‍के) मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मधुमेह हा आजार अनुवंशिक, बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होऊ शकतो. वाढत्या वयामुळे शरीराची रचना आणि इन्‍सुलिन प्रतिकारशक्‍ती बदलत जाते त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेहासारखा आजार झाल्यास त्यात योग्यप्रकारे औषध घेणे, रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाणाची तपासणी करणे, या सर्व गोष्‍टींसाठी योग्‍य नियोजनाची गरज असते. मधुमेह झालेल्या वडिलांची काळजी मुले उत्तमरित्या घेत आहेत. काही सोपे उपाय आहेत, जे मुलांना त्‍यांच्‍या प्री-डायबेटिक किंवा मधुमेही वडिलांची काळजी घेण्‍यास मदत करू शकतात.

१. मधुमेह असलेली व्‍यक्‍ती लठ्ठ असते ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका, स्‍ट्रोक किंवा मूत्रपिंड आजार अशा आजारांचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. आपल्या पालकांना पोहणे, सायकल चालवणे, जॉगिंग सारखे शारीरिक व्‍यायाम करायला सांगा ज्यामुळे त्यांचे वजन कमी होईल.

Health issue, diabetes problem
अनियमित मासिक पाळीची समस्या रोखण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा

२. खाण्यापिण्यात मद्य पेये, शीतपेये, ज्‍यूस, मिठाई, कँडी यांसारखे पदार्थ टाळा. यामध्ये रिफाइन्‍ड केलेल्या साखरेचा वापर केलेला असतो त्यामुळे रक्तातील साखर सहज वाढू शकते.

३. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या ग्‍लुकोज चाचणी आठवड्यातून किमान दोनदा तरी चाचणी करायला हवी. बाजारात मधुमेह चेक करण्यासाठी काही इलेक्ट्रिक उत्पादने मिळतात त्याचा वापर आपण करु शकतो.

४. सतत चिंता किंवा ताण घेतल्याने आपले हार्मोन्‍स बदलत राहातात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते अशावेळी मेडिटेशन करा.

५. संशोधनातून असे निदर्शनास आले की, पुरूषाच्‍या शरीरामध्‍ये टेस्‍टोस्‍टेरोन पातळ्यांमधील असंतुलामुळे मधुमेह होऊ शकतो. हार्मोन्‍सची योग्‍य पातळी राखल्याने मधुमेहाचा धोका कमी होण्‍यास मदत होऊ शकते. तसेच जीवनसत्‍व ड व झिंक असलेले खाद्यपदार्थ टेस्‍टोस्‍टेरोन पातळ्या आणि पुरूषांची प्रजननक्षमता वाढवण्‍यास मदत करतात.

६. तंबाखू किंवा सिगारेटचे सेवन करत असल्यास ते योग्य वेळी थांबवा त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते व आपल्याला इतर समस्यांना सामोरे जावे लागेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com