Heat Wave: उष्णतेच्या लाटेत 'अशी' घ्या आरोग्याची काळजी...

देशाचा मोठा भाग उष्णतेच्या लाटेच्या सावटाखाली आहे आणि पुढील काही दिवसात तापमानात तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, त्या साठी सुरक्षित राहण्याचे मार्ग समजून घेऊ, व काही उपयोगी होमिओपॅथिक औषधे पण सांगितले आहेत.
Heat Wave: उष्णतेच्या लाटेत 'अशी' घ्या आरोग्याची काळजी...
Heat WaveSaam Tv

-डॉ. रणजित ढोले (एम डी होमिओपॅथी)

देशाचा मोठा भाग उष्णतेच्या लाटेच्या सावटाखाली आहे आणि पुढील काही दिवसात तापमानात तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, त्या साठी सुरक्षित राहण्याचे मार्ग समजून घेऊ, व काही उपयोगी होमिओपॅथिक औषधे पण सांगितले आहेत. (How To Take care of health In Summer)

उष्णतेची लाट केव्हा घोषित कली जाते ?

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कमाल तापमान किमान 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होते.

●उष्णतेची लाट: जेव्हा वास्तविक कमाल तापमान ≥ 45°C

●तीव्र उष्णतेची लाट: जेव्हा वास्तविक कमाल तापमान ≥47°C

Heat Wave
'अल्टिमेटमवर देश चालतो का?' राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय राऊत संतापले

या कालावधीत सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही कोण कोणते उपाय करू शकता?

१) कामे करताना - दुपारी १२ ते ४ या वेळेत घरामध्ये किंवा सावलीच्या ठिकाणी रहा.

२) बाहेर असताना छत्री/टोपी/टॉवेल वापरा. पातळ सैल सुती, हलक्या रंगाचे कपडे घाला.

३) पाणी आणि खारट पेये (लस्सी,ताक, लिंबू पाणी, फळांचे रस, ओआरएस) वारंवार प्या.

४) टरबूज, काकडी, लिंबू, संत्री इत्यादी फळे खा.

५) वारंवार थंड आंघोळ करा व खोलीचे तापमान कमी करा. खिडकीच्या शेड्स/पडदे, पंखा, कूलर, एअर कंडिशनर, क्रॉस-व्हेंटिलेट रूम, पाणी शिंपडा इत्यादी वापरा.

जर एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल -

विशेषत: वृद्ध, लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि घराबाहेर काम करणारे कामगार - त्यांना ताबडतोब सावलीच्या ठिकाणी हलवावे, कमीतकमी कपडे घालावे, थंड पाण्याने पुसून घ्या आणि जवळची आरोग्य सुविधा जेथे असेल तेथे जा.

हे देखील पहा-

हे टाळा-

१. उन्हात बाहेर जाणे, विशेषत: दुपार १२ ते ३ च्या दरम्यान टाळावे.

२. दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर कष्टाची कामे करणे टाळावे.

३. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे.

४. उन्हाळ्यात काचा बंद वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी काही मिनीटात साठी सुद्धा ठेवून जावु नये.‌

५. गडद रंगाचे, सिंथेटिक आणि घट्ट कपडे घालु नये.

जर कोणाला उष्माघात सोम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे आढळल्यास काही होमिओपॅथिक औषधे वापरता येतात.‌ त्यामध्ये अमायलेनम नायट्रोसम, ग्लोनोइनम, बेलाडोना, कॅम्पहोरा, वेराट्रम अल्बा, इत्यादी औषधे लक्षणांनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.