पावसाळ्यात आपल्या स्वयंपाक घराची काळजी कशी घ्याल?

स्वयंपाक घर हे आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो.
पावसाळ्यात आपल्या स्वयंपाक घराची काळजी कशी घ्याल?
how to take care of your kitchen in the monsoon, Monsoon Tips, Kitchen Tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पावसाळा हा वर्षातील सुंदर काळ असून पाऊस पडतो तेव्हा आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि हिरवागार दिसतो. मात्र पावसाळ्यात जास्त ओलावा असल्याने काही समस्याही निर्माण होतात. त्यामुळे घरातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Monsoon Tips in Marathi)

हे देखील पहा-

स्वयंपाक घर हे आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. परंतु, स्वयंपाकघर आपल्या घरातील खास जागा, येथेही पावसामुळे आर्द्रतेच्या अनेक समस्या सुरू होतात. त्यामुळे आपले टेन्शन वाढते. पण काही खास गोष्टींची काळजी घेतल्यास स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघरातील साहित्य पावसाच्या ओलाव्यामुळे खराब होण्यापासून वाचवता येते. पावसाळ्यात स्वयंपाकघराची काळजी कशी घ्यायची ते जाणून घेऊया -

१. पावसाच्या ओलाव्यामुळे स्वयंपाकघरात किटक वाढू लागतात. त्यामुळे ते आजारांना निमंत्रण देतात. त्यामुळे पावसाळ्या स्वयंपाकघराची स्वच्छता आपण राखली पाहिजे. स्वयंपाक घरात लाकडी कपाट असल्यास कीटक आणि झुरळे होऊ लागतात त्यावर कीटकनाशक फवारावे. फवारणी करताना स्वयंपाकघरात कोणतेही अन्नपदार्थ ठेवू नये

how to take care of your kitchen in the monsoon, Monsoon Tips, Kitchen Tips
फ्रीजरमध्ये अन्नपदार्थ साठवताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

२. स्वयंपाकघरात (Kitchen) असणारे मसाले पावसाळ्यात दमट हवेमुळे ओले होऊन खराब होतात. इतकेच नाही तर गरम मसाल्याचा सुगंधही ओलाव्यामुळे उडू लागतो. त्यामुळे मसाले अधूनमधून उन्हात ठेवावेत आणि हवाबंद डब्यात ठेवल्याची खात्री करा.यामुळे, ओलावा बॉक्सच्या आत जाणार नाही आणि ते खराबही होणार नाहीत.

३. पावसाळ्यात आपण खाद्यपदार्थं हवाबंद बॉक्समध्ये ठेवायला हवे. मसूर, तांदूळ किंवा बिस्किटे आणि स्नॅक्स असोत. साखर, चहाची पाने, मीठ आणि कॉफीसाठी देखील अशा कंटेनरचा वापर करा. काहीही वापरल्यानंतर लगेच, बॉक्स घट्ट बंद ठेवा जेणेकरुन त्यातील सामग्री पावसाचा ओलावा शोषून खराब होणार नाही.

४. पावसाळ्यात (Monsoon) आपण फ्रीजची देखील स्वच्छता राखायला हवी. तसेच, फ्रीजमध्ये जास्त शिळे अन्न ठेवू नये. यामुळे फ्रीजमध्येही जंतू होतात. फ्रीजचा बाहेरचा भाग कोलीन किंवा लिंबू पाण्याने स्वच्छ करू शकतो तर, आतील भाग कोरड्या किंवा हलक्या ओल्या कपड्याने स्वच्छ करा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com