डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची संधी, तब्बल ७६ हजारांपर्यंत मिळेल वेतन

ग्रेड सी मध्ये १८६ पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. यामध्ये तंत्रज्ञ, प्रयोगशाळा विश्लेषक, कनिष्ठ अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, यासारखी पदे रिक्त आहे.
Jobs
Jobs Saam TV

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत (HPCL Recruitment 2022) लवकरच काही पदांची भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक तसेच पात्र उमेदवार एचपीसीएलच्या hindustanpetroleum.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन २१ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. (Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment 2022)

Jobs
तंत्रज्ञान जगातील तिसरी मोठी डील, मायक्रोसॉफ्ट अव्वल, पहा संपूर्ण यादी

या पदांसाठी होणार भरती

माहितीनुसार ग्रेड सी मध्ये १८६ पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. यामध्ये तंत्रज्ञ, प्रयोगशाळा विश्लेषक आणि कनिष्ठ अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, यासारखी पदे रिक्त आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २६,००० ते ७६,००० पर्यंत पगार दिला जाईल.

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट

भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संबधित ट्रेडमधील डिप्लोमा मान्यताप्राप्त संस्थेतून किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना ५० टक्के गुणांची शिथिलता देण्यात आली आहे. यासोबत उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२२ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

असा करता येईल अर्ज

- इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सर्वप्रथम HPCL च्या hindustanpetroleum.com या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

- इथे तुम्हाला करिअर विभाग असा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यास रिफायनरीसाठी टेक्निशियन रिक्रुटमेंट असा एक पर्याय दिसेल या लिंकवर क्लिक करायचं आहे.

- त्यानंतर ड्रॉप डाउनमध्ये दिलेल्या लिंकवरून भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन डाउनलोड करावे.

- त्यानंतर ऑनलाईन अर्ज या पेजवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. लक्षात ठेवा अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून ५९० रुपये भरावे लागतील.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com