काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दल
काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दलSaam Tv

काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दल

रहस्यांनी भरलेली पाकिस्तानची ही खोरी आहे.

जगामध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. या रहस्यांचा उलगडा करण्याचा शास्त्रज्ञ सतत प्रयत्न करत असतात. पाकिस्तानच्या शेजारील देशाची एक दरीही रहस्यांनी भरलेली आहे. उत्तर पाकिस्तानच्या हुंजा खोऱ्यात, लोक 120 वर्ष ते 150 वर्षे जगू शकतात. हो! तर पाकिस्तानमधील लोकांचे सरासरी वय फक्त 67 वर्षे आहे. येथे हुंजा समाजाचे लोक राहतात.

हुंजा खोऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचे रहस्य काय आहे? ते अद्याप जगाच्या बहुतांश भागात पोहोचलेले नाही. हुंझा समाजातील लोकांचे वय हाही वादाचा मुद्दा राहिला आहे. येथे राहणारे लोक जगापासून दूर आणि वेगळे राहतात आणि त्यांच्या काही खास सवयींमुळे ते अधिक निरोगी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अखेर पाकिस्तानच्या या खोर्‍यातील लोक इतकी वर्षे कसे तग धरून राहिले, हे अजूनही रहस्य आहे.

काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दल
काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दलSaam Tv

असे मानले जाते की या खोऱ्यात राहणारे हुंझा समुदायाचे लोक जास्त वय असले तरी मुले जन्माला घालू शकतात. इथे ना कधी लोक आजारी पडतात ना त्यांना कॅन्सरसारखा आजार होतो. एका अहवालानुसार तर, हुंजा समुदायातील महिला 60 ते 90 वर्षे वयापर्यंत गर्भधारणा करू शकतात. सामान्य माणसाचा या दाव्यावर विश्वास सुद्धा बसणार नाही.

हुंजा व्हॅली उत्तर पाकिस्तानच्या अगदी निर्जन भागात आहे. येथे राहणारे लोक कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया केलेले अन्न (Processed Food) खात नाहीत. हे लोक भाज्या, दूध, तृणधान्ये आणि फळे विशेषतः जर्दाळू खातात. ग्लेशियरचे पाणी पिण्यासाठी तसेच आंघोळीसाठी वापरले जाते.

काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दल
काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दलSaam Tv

लोकांना रोग होत नाहीत;

हुंजा समाजातील लोक जर्दाळूची फळे खूप आवडीने खातात. असे मानले जाते की या फळाचा रस प्यायल्याने तेथील लोक अनेक महिने जगू शकतात. जर्दाळूच्या बियांमध्ये अमिग्डालिन असते जे व्हिटॅमिन बी-17 चा स्रोत आहे. त्यामुळे लोकांना कॅन्सरसारखा जीवघेणा आजारही होत नाही. हे लोक आपल्या खाण्यापिण्यात कच्च्या फळे आणि भाज्यांना प्राधान्य देतात. हे लोक मांस कमी खातात. हे ठिकाण जगापासून वेगळे आहे त्यामुळे लोकांना स्वच्छ हवा सहज मिळते.

असे म्हटले जाते की हुंझा समुदायाचे लोक दररोज नियमितपणे योगा देखील करतात, ज्यामध्ये श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यान यांचा समावेश होतो. सतत कामाच्या दरम्यान, इथले लोक विश्रांती घेतात तसेच भावनिक ताण (Stress) वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणेच पसंत करतात.

काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दल
काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दलSaam Tv

हॉलिवूड चित्रपटात द व्हॅलीचा उल्लेख;

1930 साली लॉस्ट होरायझन हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये हुंजा समाजाचा उल्लेख करण्यात आला होता. हा चित्रपट जेम्स हिल्टनच्या कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटात इंग्रजी सैन्याचा काफिला चीनमधून येत असताना हिमालयाच्या प्रदेशात थांबतो. चित्रपटात स्थानिक लोक क्रूला भेटतात आणि हिमवादळामुळे ते हुंजा येथे आश्रय घेतात.

काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दल
काय सांगता! पाकिस्तानात लोक जगतात 150 वर्ष; जाणून घ्या त्या ठिकाणबद्दलSaam Tv

समाज रहस्यांनी भरलेला!

समुदाय हा समुदाय रहस्यांनी भरलेला आहे. आजसुद्धा येथे परी असल्याचे मानले जाते. लोकांचा असा विश्वास आहे की परी अजूनही हुंझा खोऱ्याच्या आसपास राहतात आणि स्थानिक लोकांचे बाहेरील धोक्यांपासून संरक्षण करतात. मेंढ्या, शेळ्या चरणाऱ्या मेंढपाळांच्या म्हणण्यानुसार, उंच ठिकाणी गेल्यावर त्यांना परींचा आवाज ऐकू येतो. येथील एका व्यक्तीने एका मुलाखतीत सांगितले होते की, परी माणसांसारख्या दिसतात आणि सोनेरी केस आणि हिरव्या कपड्यांमध्ये राहतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com