Bad Cholesterol Sign : अचानक कोलेस्ट्रॉल वाढल्यास पायात दिसू लागतात ही लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष

Causes of High Cholesterol : शरीरात कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढली की अनेक आजार बळावण्यास सुरूवात होते.
Bad Cholesterol Sign
Bad Cholesterol SignSaam Tv

Bad Cholesterol Symptoms : हल्ली मधुमेह आणि रक्तदाबाच्या आजारांबरोबर वाढत असलेला आजार म्हणजे हाय कालेस्ट्रॉल. शरीरात कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढली की अनेक आजार बळावण्यास सुरूवात होते.

आपल्या निरोगी शरीराला आव्हान देणाऱ्या अशा हानिकारक आजारांपासून बचाव करण्यासाठी त्यांची लक्षणे (Symptoms) वेळेत समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. ज्यामुळे त्यावर योग्यवेळी उपचार करणे सोपे होते. आज आपण हाय कोलेस्ट्रॉलची काही लक्षणे पाहाणार आहोत. त्यामुळे रोगाचे निदान करण्यास मदत होईल.

Bad Cholesterol Sign
Bad Cholesterol Symptoms : या चुकीच्या कारणांमुळे वाढते कोलेस्ट्रॉल, कसे कराल कंट्रोल ? जाणून घ्या सविस्तर

शरीरात गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात ज्यांच्या मदतीने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेव्हल तपासता येते. बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक आजार (Disease) होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर जर दुर्लक्ष केले तर ते आपल्या जीवावर बेतू शकते.

शरीरातील बॅड फॅट जेव्हा नसांमध्ये साठू लागते तेव्हा रक्तप्रवाह मंदावतो. अशा वेळी हृदयविकार (Heart Attack) व हृदयासंबंधित इतर आजार यांशिवाय स्ट्रोक यासारखे आजार उद्भवू शकतात. चुकीचा आहार आणि बदललेली जीवनशैली या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. या आजाराचे निदान रक्त तपासणीच्या माध्यमातून केली जाऊ शकते. परंतु अशी काही लक्षणे ही आहेत ज्यामुळे आपण हा आजार ओळखू शकतो. जाणून घेऊयात त्या लक्षणांना.

Bad Cholesterol Sign
High Cholesterol : तरुण वयात शरीर देत आहे हे सिग्नल, तुम्हाला देखील उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका नाही ना ?

हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणेः

1. पायांचे तळवे थंड पडणे

जर तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांत देखील आपल्या पायाचे तळवे थंड जाणवत असतील तर हे कदाचित हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते, तेव्हा लवकरात लवकर आपल्या कोलेस्ट्रॉची तपासणी करुन घेणे फायद्याचे ठरेल. तसेच इतर कारणांमुळे देखील पायाच्या तळव्यांना सूज येऊ शकते. म्हणून या लक्षणाकडे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यावर परिणामकारक ठरु शकते.

2. पायाच्या त्त्वचेतील बदल

शरीरात पोषकत्त्वांच्या आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे त्त्वचेवर परिणाम होऊन ती पिवळी दिसू शकते. पण त्याच बरोबर शरीरात रक्तप्रवाह सुरळीत नसल्यास देखील पायांच्या त्त्वचेचा रंग बदलू शकतो. सोबतच पायात क्रॅम्प्स येणे ही समस्या देखील जाणवू शकते. यामुळे किडणीचे बिघडलेले आरोग्य दिसून येते. अशा परिस्थितीत आपल्या डॉक्टरांना संपर्क साधून वेळीच उपचार सुरू करणे आवश्यक ठरते.

Bad Cholesterol Sign
Lizards At Home : झोपतेतून उठल्यानंतर पाल दिसली तर, समजा...

3. पाय सतत दुखणे

कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेकदा पाय सतत दुखू लागतात. यावर बरेच लोक पेन किलर्स किंवा इतर औषधे घेतात परंतु हे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण देखील असू शकते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल एकूण 200 mg/dl पर्यंत कमी होणे गरजेचे असते. त्याचबरोबर तेच एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल 100 mg/dl पर्यंत कमी होणे गरजेचे असते. यापेक्षा वरच्या पातळीचे कोलेस्ट्रॉल पायांबरोबर शरीराच्या इतर अवयवांवर देखील लक्षणे दिसू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com