
Eye Problems : आपल्या शरीरातील डोळे हा सर्वात नाजूक भाग आहे. डोळ्यात उद्भवणाऱ्या लहान समस्येचाही खूप त्रास होतो. कधीकधी डोळ्यात वेदना होतात आणि सूज येते. हा किरकोळ वाटणारा त्रास खूप गंभीर असू शकतो.
आहारात मीठ जास्त प्रमाणात वापरणे -
जास्त सोडियम युक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने डोळ्याखाली फुगीरपणा वाढू शकतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण अतिरिक्त सोडियममुळे वाढू शकते. परिणामी चेहरा आणि शरीरावर सूज येऊ शकते. रात्रीच्या वेळी अधिक मीठ खाल्ल्याने हा त्रास तीव्र होऊ शकतो. त्यामुळे मिठाचे सेवन कमीत कमी करून तुम्ही या समस्या दूर करू शकतो.
झोपेचा अभाव -
पुरेशी झोप निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असते. जर झोप पूर्ण झाली नाही तर डोळ्याखाली सूज येऊ शकते. त्यासोबतच डोळ्यांखाली डार्क सर्कलस दिसायला सुरुवात होते डोळ्यांनभोवतीचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे हा त्रास टाळण्यासाठी तुम्हाला पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
धूम्रपान -
धूम्रपान केल्यामुळे डोळ्यांची जळजळ होऊ शकते. डोळे लाल होणे, डोळ्यांवर सुज येणे या समस्या उद्भवतात. जर तुम्ही सेकंड हॅन्ड किंवा थर्ड हॅन्ड स्मोकर असाल तर तुम्हाला एलर्जी असू शकते. जेणेकरून डोळ्यांना सूज येणे आणि आयबॅग त्रास होतो.
एलर्जी -
एलर्जी मुळे डोळ्यांना त्रास होऊन डोळ्याभोवती द्रव जमा होऊ शकतात. परिणामी डोळ्याखाली सूज येऊ शकते. एलर्जीमुळे डोळ्यात लालसरपणा डोळ्यांना खाज सुटले आणि डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या उद्भवतात. रडल्याने डोळ्याभोवती द्रव जमा होते. परिणामी काही वेळ सूज येण्याची शक्यता असत.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.