door handle gets stuck in the rain, Monsoon tips and tricks
door handle gets stuck in the rain, Monsoon tips and tricksब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्यात दरवाज्याचे हँडल जाम झाल्यास या टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात आपल्या घरातील काही भागांना ओलावा निर्माण होतो.

मुंबई : पावसाळ्यात आपल्या घरातील काही भागांना ओलावा निर्माण होतो.त्यामुळे घरातील इतर वस्तूंवर त्याचा परिणाम होऊ लागतो. (Monsoon tips and tricks)

हे देखील पहा-

पावसाळ्यात दरवाज्याचे हँडल त्याचा चुकीचा वापर किंवा घाईघाईने उघडणे किंवा बंद करणे यामुळे ते खराब होते किंवा जाम होते. काही वेळा दरवाजाचे हँडल जाम होतात आणि ते वापरण्यात अडचण येते. विशेषतः पावसाळा हा असा ऋतू आहे, ज्याचा घराच्या भिंतीपासून घराचे दरवाजे, हँडल, कुलूप यावर खूप परिणाम होतो. दरवाजे, हँडल, कुलूप जाम झाले आहेत तर या टिप्स फॉलो करा.

१. दरवाज्याचे हँडल किंवा कडी उघडण्यात किंवा बंद करताना समस्या निर्माण होत असेल तर आपण त्यासाठी शिलाई मशीनमध्ये वापरण्यात येणारे तेल (Oil) वापरावे. यासाठी या तेलाचे काही थेंब हँडलमध्ये टाकून हळूहळू उघडून बंद करण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास जाम झालेले हँडल सहज उघडू लागते.

door handle gets stuck in the rain, Monsoon tips and tricks
बाळाच्या दातांची देखभाल कशी करता येईल ?

२. पावसाळ्यात (Monsoon) बऱ्याचदा हँडल, कुलूप जाम होतात. पावसाळ्यात हा त्रास विशेषतः वाढतो कारण पावसातील ओलावा हँडलवर सर्वाधिक परिणाम करतो. पावसाचा ओलावा शोषण्यासाठी हँडल आणि कौल जवळ हेअर ड्रायर वापरा. असे केल्याने ओलावा पूर्णपणे सुकतो ज्यामुळे जाम झालेले हँडल ठीक होण्यास मदत होते.

३. दरवाज्याची कडी जाम झाल्यास किंवा हँडल उघडण्यात अडचण येत असल्यास आपण पातळ पिनचा वापर करु शकतो. यासाठी आपल्याला हँडलच्या तळाशी आणि वरच्या टोकाला एक पातळ पिन अडकवून ते फिरवावे लागेल. ही पिन किंचित वळवून वापरल्याने जाम झालेले हँडल काम करू लागेल.

४. तसेच पावसाळ्यात आपल्या दाराचे हँडल जाम झाले असेल आणि ती बरेच वर्षे जुनी असतील तर ती बदलणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. पावसाच्या पाण्यामुळे जुनी हँडलही गंजलेली असतात त्यामुळे उघडताना आणि बंद करताना अडकतात. त्याच्या जागी नवीन हँडल निवडणे हा एक चांगला पर्याय आहे.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com