
Health Tips : सध्याचे जीवन सर्वांसाठी खूप धावपळीचे आहे.तर काही सतत एका ठिकाणी बसून काम करावे लागते कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होम चा ट्रेंड सुरू झाला आहे.
त्यामुळे बराच लोकांना दहा-बारा तास एका जागी बसून काम करावे लागते. एकाच जागी बसून राहणे किंवा पडून राहणे. तुमच्या आरोग्यासाठी (Health) धोक्याचे असू शकतो. त्याला बैठी जीवनशैली (Lifestyle) असे म्हणतात.
बैठी जीवनशैली म्हणजे नक्की काय?
हा एक जीवनशैलीचा प्रकार आहे. बैठे जीवनशैली म्हणजेच एखादी व्यक्ती त्याच्या दैनंदिन जीवनात शरीराची हालचाल न करता सतत एका ठिकाणी बसून राहतो. त्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. तसेच ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते. इतर आरोग्य समस्याचे ही सामना करण्याची शक्यता असते.
बैठी जीवनशैलीतील धोके कोणते?
बैठे जीवनशैलीमुळे फक्त आयसीयू मध्येच जाण्याचा धोका नसतो तर सक्रिय व्यक्तीच्या तुलनेत त्यांच्या जगण्याच्या दरावरही परिणाम होतो. शरीराची कोणतीही हालचाल न करता एका ठिकाणी बसून राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक वाढते. मधुमेह,हृदयरोग, कोलेस्ट्रॉल च्या समस्या आणि फॅटी लिव्हर इत्यादींचा धोका असण्याची शक्यता आहे.
सक्रिय राहण्यासाठी काही टिप्स -
1. आठवड्यातून कमीत कमी रोज पाच दिवस व्यायाम केला पाहिजे. एक ते दीड तास व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. धावणे,वेगवान चालणे, पोहणे तसेच तुमच्या आवडीचा एखादा खेळ खेळणे.ज्याने तुमच्या शरीराची हालचाल होईल आणि तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल.
2. टेक्स्ट वर बसून सतत काम करत असाल तर मध्ये मध्ये थोडा वेळ ब्रेक घेऊन. इकडे तिकडे फेऱ्या मारा त्यामुळे तुमचे स्नायू कडक होणार नाही.
3. दारू आणि धूम्रपानाचे सेवन करू नका.
4. तुम्ही व्यायाम सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता पण जेवण केल्यानंतर शतपावली करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.