गरोदरपणात मोबाईलपासून राखा अंतर नाही तर; बाळावर होईल त्याचा दुष्परिणाम!

गर्भवती महिलांनी मोबाईल वापरताना काय काळजी घ्यायला हवी ?
गरोदरपणात मोबाईलपासून राखा अंतर नाही तर; बाळावर होईल त्याचा दुष्परिणाम!
pregnancy tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मोबाईलच्या अतिवापराने आपल्या आरोग्याला हानी पोहोचते हे आपल्या सर्वांना माहित आहे. गरोदरपणात मोबाईलच्या वापरामुळे न जन्मलेल्या बाळाच्या विकासावर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे प्रसूती वेळेपूर्वी होऊ शकते. फक्त आईच नाही तर आईच्या आजूबाजूला लोक जास्त वायरलेस गोष्टी वापरत असतील तर त्याचा वाईट परिणाम गर्भात वाढणाऱ्या मुलावरही होतो.

हे देखील पहा-

गरोदर (Pregnant) महिलेच्या आजूबाजूला जास्त मोबाईल (Mobile) रेडिएशन असेल तर त्याचा परिणाम आपल्या पोटातील बाळावर होऊ शकतो. एवढेच नाही तर, मुलाला आयुष्यभर अनेक समस्यांमधून जावे लागू शकते. जाणून घ्या, गरोदरपणात मोबाईल रेडिएशनमुळे न जन्मलेल्या मुलाच्या विकासात कोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि ते कसे टाळता येईल. चला तर मग जाणून घेऊया गरोदरपणात मोबाईलच्या वापरामुळे बाळाचे (Baby) काय नुकसान होऊ शकते आणि ते कसे टाळता येईल.

वायरलेस डिव्हाइसचा कसा परिणाम होतो

जेव्हा आपण मोबाईल, लॅपटॉप किंवा कोणत्याही प्रकारच्या वायफाय किंवा वायरलेस उपकरणाच्या संपर्कात येतो, तेव्हा त्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या लहरी सतत बाहेर पडत राहतात. या लहरींमध्ये आपल्या शरीराच्या डीएनएला नुकसान पोहोचवण्याची क्षमता असते त्यामुळे आपल्या शरीरात तयार होत असलेल्या जिवंत पेशींचे रेणू बदलू शकतात. ज्याचा परिणाम थेट आपल्या बाळावर होऊ शकतो. गर्भ सतत वाढत असल्याने, त्याचा डीएनए आणि जिवंत पेशी सहजपणे त्यात अडकतात. ज्याचा परिणाम खूप घातक ठरू शकतो.

pregnancy tips
Skin Care : भेगा पडलेल्या टाचांपासून अशी मिळवा सुटका!

वेगवेगळ्या रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, मोबाईलच्या वापराचा मुलांवर विशेष परिणाम होत नाही, परंतु जर आई आणि मूल सतत मोबाईल रेडिएशनच्या संपर्कात असेल तर मुलाची स्मरणशक्ती व मेंदूच्या विकासात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर अशा मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते, जी कालांतराने वाढते. एवढेच नाही तर मुलांच्या भाषेवर आणि संवादावरही याचा वाईट परिणाम होतो. यासाठी गर्भवती महिलांनी फोनचा वापर करताना काळजी घ्यावी.

डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com