भांड्यांवर असणाऱ्या डागांपासून तुम्ही देखील त्रस्त आहात तर, हे नक्की ट्राय करून पहा

भांड्यांवरचे डाग सहज काढायचे आहेत तर या गोष्टी फॉलो करा.
भांड्यांवर असणाऱ्या डागांपासून तुम्ही देखील त्रस्त आहात तर, हे नक्की ट्राय करून पहा
suffer from stains on utensils, try this, Home Cleaning Tips, Easy Ways To Clean House, DIY Hacks Home Cleaning in Marathi, Utensils stains cleaning tips in Marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हल्लीच्या ट्रेंडनुसार आपल्या घरात जुन्या पिढीतली भांडी आजतागायत आपल्याला पाहायला मिळतात. परंतु, या भांड्यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे कठीण होते. नवीन पद्धतीनुसार आपण वेगवेगळ्या डिजाईनचे, मॉडेलची भांडी घरात आणतो व वेगवेगळ्या प्रकारची भांडी आपण वापरतो. परंतु, कधीतरी जुनी भांडी वापरताना त्यावर अगोदरच या भांड्यांना डाग पडलेले असतात. जे या भांड्यांमधून काढणे सोपे नाही. जर ही भांडी स्वच्छ (Clean) केले नाहीत तर, ती चांगली दिसत नाहीत. ऐनवेळी ही भांडी वापरताना त्यावरचे डाग कसे काढायचे, असा प्रश्न निर्माण होतो. (DIY Hacks Home Cleaning in Marathi)

हे देखील पहा -

भांड्यांवर पडलेल्या डागांपासून सहज सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करा.

भांड्यांवरचे डाग कसे काढायचे

१. स्टीलच्या भांड्यांचे डाग -

स्वयंपाकघरात सतत वापरल्या जाणाऱ्या काही भांड्यांना डाग पडतात आणि ही भांडी खराब दिसू लागतात. अनेकदा स्टीलच्या भांड्यांमध्ये पाण्याच्या थेंबांचे डाग दिसतात. हे डाग सहजासहजी निघत नाही. हे डाग घालवण्यासाठी कांद्याचा रस आणि व्हिनेगरचा वापर करु शकता. कांद्याचा (Onion) रस आणि व्हिनेगर मिक्स करून जेल तयार करा. भांडी धुतल्यास त्यात थोडेसे लिक्विड डिटर्जंट टाकल्यास भांड्यांवरचे पाण्याचे डाग सहज निघून जातात.

suffer from stains on utensils, try this, Home Cleaning Tips, Easy Ways To Clean House, DIY Hacks Home Cleaning in Marathi, Utensils stains cleaning tips in Marathi
Skin Care : उसाच्या रसाचे सेवन केल्यास वाढू शकते तुमचे सौंदर्य !

२. पितळेच्या भांड्यांवरील डाग -

आपल्यापैकी अनेकांच्या घरात पितळेची भांडीही वापरली जातात. पितळ हवा आणि पाणी दोन्हीवर प्रतिक्रिया देतात. त्यामुळे पितळाच्या भांड्यांवरील डाग फार सहज दिसतात. अशा स्थितीत या डागांपासून मुक्तता मिळवण्यासाठी अर्धा लिंबाच्या तुकड्यावर मीठ लावून पितळेची भांडी स्वच्छ करा. असे केल्याने भांड्यांवरचे डाग सहज दूर होतील.

३. अँल्युमिनियमच्या भांड्यांवरील डाग -

आपल्या घरात अ‍ॅल्युमिनियमची भांडी फार पूर्वीपासून वापरली जात आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या घरात चहा किंवा पाणी (Water) गरम करण्यासाठी हमखास अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरली जातात, पण काही काळानंतर ही भांडी काळी पडू लागतात. अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचे काळे डाग घालवण्यासाठी डिशवॉश पावडरमध्ये थोडे मीठ घालून भांडी स्वच्छ करा.

अशाप्रकारे तुम्ही भांड्यांवरचे डाग सहज काढू शकतात.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.