March Travel Plan : मार्च महिन्यात ट्रीप प्लॅन करत आहात, तर हे जबरदस्त ठिकाण तुमच्या विशलिस्टमध्ये ऍड करा

Travel Plan : मार्चचा महिना म्हणजेच उन्हाळा सुरू होणार आहे.
March Travel Plan
March Travel Plan Saam Tv

Travel Plans In March : मार्चचा महिना म्हणजेच उन्हाळा सुरू होणार आहे. हळूहळू मार्च महिन्यापासून उन्हाळा सुरू होतो. थंडीच्या कडाक्यानंतर अनेक लोक बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. जर तुम्ही यंदाच्या मार्च महिन्यात एखादी ट्रीप प्लॅन करत असाल.

तर आम्ही तुम्हाला अशा 5 ठिकाणाबद्दल आज सांगणार आहोत जिथे तुम्हाला जाऊन रिलॅक्स होता येईल. त्यासोबतच दैनंदिन जीवनापासून दूर जाऊन नैसर्गिक (Natural) सौंदर्यात वेळ घालवता येईल. चला तर मग जाणून घेऊया त्या ठिकाणांबद्दल.

March Travel Plan
Travel Tips : प्रवासाला अधिक सुखकर करण्यासाठी या गोष्टी नेहमी सोबत ठेवा

माउंट अबू, राजस्थान -

Mount Abu
Mount AbuCanva

राजस्थान येथील माउंट अबू हे प्रसिद्ध ठिकाण आहे. जर तुमची इच्छा असेल गणगौरी पूजेच्या भव्य उत्सवाचा आनंद घेयायचा, तर मार्चमध्ये तुम्ही माउंट अबू या ठिकाणी भेट देऊ शकता. माउंट अबू या ठिकाणी जाताना तुम्हाला प्रवासात (Travel) आधार देवी मंदिर ,नक्की तलाव, गायमुख मंदिर, अचलगड किल्ला या ठिकाणांचा आनंद घेता येईल.

तवांग, अरुणाचल प्रदेश -

Tawang
TawangCanva

अरुणाचल प्रदेश येथील तवांग हे ठिकाण निसर्गरम्य दृश्यांनी भरलेले अद्भुत शहर आहे. तवांग हे ठिकाण ट्रॅव्हल लव्हर्सरचे आवडीचे ठिकाण आहे. दलाई लामांचे जन्मस्थान असलेले हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध आहे.

March Travel Plan
Train Traveling : प्रवासासाठी महिलेने पकडली ट्रेन; अचानक बाळासह घेतली उडी, पुढे काय झालं?

इथे अनेक मठ आहेत. ज्याला भेट देण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. तवांग या ठिकाणाचे उल्लेखनीय वैशिष्ट्ये म्हणजे हे एक शांत ठिकाण आहे. त्यामुळे तुम्ही या शांत ठिकाणी भेट देऊन रिलॅक्स होऊ शकतात. त्यासोबतच येथे निसर्गरम्य दृश्यात तुम्ही हरवून जाल

शिलॉंग, मेघालय -

Shillong
ShillongCanva

शिलॉंग हे मेघालयातील स्थित ठिकाण भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाते. शिलॉंग येथील हिरवेगार निसर्गरम्य दृश्य नयनरम्य, मोकळी हिरवाई त्यासोबतच येथील धबधबे ,स्वच्छ पाण्याचे तलाव ,प्राणी संग्रहालय पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. तसेच तुम्हाला येथील वेगळे संस्कृती अनुभवता येईल. त्यामुळे यंदाचा मार्च महिन्यात ट्रिप प्लॅन करण्यासाठी शिलॉंग हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

उदयपूर, राजस्थान -

Udaipur
UdaipurCanva

राजस्थानच्या उदयपूरमध्ये होळी हा सण मोठा उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे मार्च महिन्यात होळीचा सण असल्याने तुम्ही या ठिकाणी ट्रीप प्लॅन करून होळीचाही आनंद घेऊ शकता. त्यासोबतच येथे एक्सप्लोर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊ शकता. या शहरातील अनेक किल्ले, राजवाडे आणि राजेशाही शैलीचा आनंद तुम्हाला घेता येईल. तसेच राजस्थानी जेवणाचा पुरेपूर आनंद तुम्हाला घेता येईल.

ऋषिकेश, उत्तराखंड -

Rishikesh
RishikeshCanva

उत्तराखंड येथील ऋषिकेशचा प्लॅन कोणत्याही महिन्यात तुम्हाला दुखी करत नाही. मात्र खास मार्च महिन्यामध्ये तुम्हाला वेगळा अनुभव येथे घेता येईल. त्यामुळे मार्च महिन्यात ऋषिकेशला जाण्याचा प्लॅन नक्की करा. येथे तुम्हाला रिवर राफ्टींग आणि अन्य व्हॉट ऍक्टिव्हिटीचा आनंद घेता येईल. त्यासोबतच संध्याकाळच्या वेळी तुम्ही इथल्या शांत घाटावर बसून वेळ घालवू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com