पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा विचार करताय तर या टिप्स फॉलो करा

हिल स्टेशनला जाण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Follow this tips if you are going trekking, Trekking tips and tricks, Monsoon trekking
Follow this tips if you are going trekking, Trekking tips and tricks, Monsoon trekkingब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ दिसू लागते. मातीचा सुवास व रिमझिम बरसणाऱ्या सरीमुळे वातावरणात गारवा निर्माण होतो त्यामुळे आपल्याला बाहेर फिरण्याच्या इच्छा निर्माण होते. (Trekking tips and tricks in Marathi)

हे देखील पहा -

पावसाळा (Monsoon) सुरु झाला की, अनेक पर्यटकप्रेमींना फिरण्याचे वेध लागतात त्यामुळे आपण अशा काही जागांची निवड करतो ज्या आपल्याला आकर्षित करत असतात. आपल्याला अशावेळी डोंगराळ भागात जाण्याची तीव्र इच्छा होऊ लागते. हिल स्टेशनला जाण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. डोंगराळ सारख्या भागात फिरायला जाताना आपल्याला या गोष्टी माहित असायला हव्या.

पावसाळ्यात डोंगराळ भागात फिरायला जाताना या गोष्टींची काळजी घ्या-

१. डोंगराळ भाग हा शहरासारखा नसतो त्यामुळे त्या ठिकाळी गाडी जात नाही. डोंगराळ भागात ट्रेकिंगला जाताना आपण आपली शारीरिक व मानसिक तयारी करायला हवी.

२. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ट्रेकिंगला जाताना पायांचे दुखणे त्रास देऊ लागते. अशावेळी ट्रेकिंगला जाण्यापूर्वी आपण वॉर्मअप करायला हवे. त्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही.

Follow this tips if you are going trekking, Trekking tips and tricks, Monsoon trekking
ट्रेकिंगला जाताय तर असे शूज निवडा

३. ट्रेकिंगला जाण्यापूर्वी आपल्या सोबत आपण एक छोटी हँडबॅग ठेवायला हवी ज्यामुळे आपल्याला फिरायला जाताना सामान अधिक जड भासणार नाही.

४. डोंगराळ भागात फिरायला जाताना आपण काही जास्तीच्या वस्तू आपल्या सोबत ठेवायला हव्या. सॉक्स, स्वेटर किंवा एक्स्ट्रा कपडे व खाण्यापिण्याचे सामान सोबत ठेवा.

५. ट्रेकिंगला जाताना आपण हिल्स किंवा फ्लॅट चप्पल घालणे टाळा. ट्रेकिंगचे शूज मिळतात आपण त्याचा वापर करायला हवा.

६. आपल्याला प्रवासाचा त्रास होत असेल तर जाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांची भेट घ्या व सोबत आपली औषधेही अवश्य घ्या.

७. ट्रेकिंगला (Trekking) जात असू तर चांगल्या कंपनीची ट्रेकिंग बॅग घ्यायला हवी. ज्यामुळे सामान घेऊन जाताना आपल्याला पाठदुखीचा त्रास उद्भवणार नाही.

८. फिरायला जाण्यापूर्वी आपल्या सुट्टीच्या दिवसात एक दिवस वाढ करुन घ्या ज्यामुळे आपल्याला घरी आल्यानंतर काही वेळासाठी विश्रांती घेता येईल.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com