नागपुरची चारकोल (काळी) इडली खाल तर अजून मागाल! पहा अण्णा रेड्डींची काळी इडली...

गलेलठ्ठ पगाराची मोठ्या हॉटेलची नोकरी सोडून इडलीत प्रयोग करणारे अण्णा रेड्डी यांनी नागपुरात काळी इडली तयार केली आहे.
नागपुरची चारकोल (काळी) इडली खाल तर अजून मागाल! पहा अण्णा रेड्डींची काळी इडली...
नागपुरची चारकोल (काळी) इडली खाल तर अजून मागाल! पहा अण्णा रेड्डींची काळी इडली...संजय डाफ

नागपुर: सकाळच्या नाश्त्यात खवय्यांची आवडती पांढरी इडली सर्वांनाच माहित आहे. मात्र, काळी इडली (Charcoal Idli) कधी पाहिली आणि चाखली आहे का? नागपूरात (Nagpur) ही काळी इडली मिळते आणि ही काळी इडली सध्या चर्चेचा विषय आहे. या काळ्या इडलीनं नागपूरकरांना भुरळ घातली असून खवय्यांच्या (Foodie's) ही इडली खाण्यासाठी उड्या पडताहेत. (If you eat Nagpur's charcoal (black) idli, you will ask for more! See Anna Reddy's Black Idli)

हे देखील पहा -

मुळची दक्षिण भारतातली मात्र आता अखिल भारतीय खाद्यपदार्थ म्हणून रोज कोट्यवधी भारतीयांकडून खाल्ली जाणारी इडली मुळात पांढऱ्या रंगाची असते. मात्र नागपुरात एका प्रयोगशील इडली प्रेमीने चक्क काळी इडली तयार केली आहे. ही इडली नागपूरकरांच्या पसंतीसही उतरली आहे. "चारकोल इडली" (Charcoal Idli) नावाने ही काळी इडली सध्या नागपुरात प्रसिद्ध झाली आहे. या इडलीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. गलेलठ्ठ पगाराची मोठ्या हॉटेलची नोकरी सोडून इडलीत प्रयोग करणारे अण्णा रेड्डी (Anna Reddy, Nagpur) यांनी नागपुरात काळी इडली तयार केली आहे. नारळाचा खोल, संत्र्याची साल, बीट रूटचा पल्प असे पदार्थ वापरून ही खास चारकोल इडली तयार केली जाते. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात कदीम बाग नर्सरी जवळ कुमार रेड्डी यांच्या स्टॉलवर ही इडली मिळते.

नागपुरची चारकोल (काळी) इडली खाल तर अजून मागाल! पहा अण्णा रेड्डींची काळी इडली...
पाठलाग करून जंगली हत्तीनं माणसाला तुडवलं; Video पाहून अंगावर येईल शहारा

सकाळी वॉकर्स स्ट्रीटवर मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागपूरकर या चारकोल इडलीसह शंभर प्रकारच्या वेगवेगळ्या इडलीचा आस्वाद रेड्डी अण्णाच्या स्टॉलवर घेतात. रेड्डी यांना लहानपणापासूनच भारतीय खाद्यपदार्थांची आणि खास करून इडलीची आवड असल्यामुळे 2016 मध्ये "ऑल अबाउट इडली" या नावाने इडल्यावर वेगवेगळे प्रयोग सुरू केले. आजवर इडल्यांचे 100 पेक्षा जास्त प्रकार बनवणाऱ्या अण्णा रेड्डींना काळ्या इडलीनेच खरी ओळख दिली.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com