Protein Deficiency : 'ही' लक्षणे जाणवत असल्यास वेळीच व्हा सावध ! असू शकते प्रोटीनची कमतरता

Protein Deficiency Symptoms : आरोग्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. अमिनो ॲसिडपासून बनलेले प्रोटीन शरीरातील प्रत्येक पेशीचा भाग आहे.
Protein Deficiency
Protein Deficiency Saam Tv

Protein Deficiency Causes : आरोग्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. अमिनो ॲसिडपासून बनलेले प्रोटीन शरीरातील प्रत्येक पेशीचा भाग आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वांपैकी प्रोटीन एक आहे. हे स्नायूंसाठी बिल्डिंग बॉक्स म्हणून ओळखले जाते.

त्यासोबतच शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी आणि हार्मोन्सच्या समस्या दूर करण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते. शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या लक्षणाबद्दल (Symptoms) सांगणार आहोत.

Protein Deficiency
Protein Rich Foods : कितीही आराम केला तरी शरीर सतत थकलेले जाणवते ? एनर्जी वाढवण्यासाठी 'या' 6 प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा

खूप भूक -

वेळेवर जेवण (Diet) करूनही जर तुम्हाला भरपूर भूक लागत असेल किंवा सतत काहीतरी खावेसे वाटत असेल. तर हे शरीरातील प्रोटीनच्या कमतरता असण्याचे लक्षण आहे.

कमजोरी आणि थकवा -

अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे शरीरातील प्रोटीनच्या कमतरतेमुळे या समस्या उद्भवतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन मिळणे गरजेचे असते. शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते तेव्हा आपले स्नायू प्रोटीनची गरज भागवते. परिणामी स्नायूंना इजा होऊ लागते त्यामुळे हळूहळू शरीर कमजोर होते. त्यासोबतच थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

Protein Deficiency
Protein Food : मसल्स हवेत फिट तर आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा !

दुखापत बरी होण्यास वेळ लागणे -

अपघातामुळे झालेली दुखापत किंवा तुमच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल तर ती जखम बरी होण्यास भरपूर वेळ घेत असेल. तर याचे कारण शरीरात प्रोटीनची कमतरता असू शकते. शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कमी झाल्याने जखम भरून येण्यास फार वेळ लागतो.

कमकुवत रोगप्रतिकारशक्ती -

शरीरात प्रोटीनचे प्रमाण कमी झाल्याने तुम्ही सारखे आजारी पडू शकता. रोगप्रतिकार शक्तीसाठी आवश्यक असलेले प्रोटीनचे प्रमाण शरीरात कमी झाल्याने रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. रोगप्रतिकारक पेशी अमिनो ॲसिडपासून बनलेल्या असतात. हे एक प्रकारे प्रोटीन आहे. त्यामुळे शरीरातील योग्य प्रमाणत असलेले प्रोटीन वायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण टाळते.

त्वचा, केस आणि नखांच्या समस्या -

शरीरातील प्रोटीनचा कमतरतेचे परिणाम त्वचा, केस आणि नखांवर होतो. नखे कमकुवत होणे, त्वचा कोरडी होणे आणि केस गळणे या समस्यांना सामोरे जावे लागते. कारण केस, नखे आणि त्वचा विशिष्ट प्रकारच्या प्रोटीन जसे की कोलेजण आणि कोराटीनने बनलेले असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com