Relationship Tips : तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात 'हे' बदल दिसताय, तर होतेय तुमच्या सोबत फसवणूक !

सांगणारे बरेचदा सांगतात की, नात्यांमध्ये अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. पण तरीही कोणत्याही नात्यामध्ये अपेक्षा करणे हे साहजिकच आहे आणि यामध्ये गैर काहीच नाही.
Relationship Tips
Relationship TipsSaam Tv

Relationship Tips : प्रेमात पडणं खूप सोपं आहे पण ते निभावणं खूपच कठीण. हा अनुभव प्रेमात पडलेल्या प्रत्येकानेच घेतलेला असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हा अनुभव कधी ना कधी येतोच किंवा येणार असतोच.

प्रेमात पडणं खरं तर सोपं आहे. पण कायमस्वरूपी हे प्रेम सांभाळून ठेवणं अतिशय कठीण आहे. सांगणारे बरेचदा सांगतात की, नात्यांमध्ये (Relation) अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. पण तरीही कोणत्याही नात्यामध्ये अपेक्षा करणे हे साहजिकच आहे आणि यामध्ये गैर काहीच नाही.

कारण प्रत्येक मुलीला किंवा मुलाला आपल्या पार्टनरकडून प्रेम आणि काळजी याची अपेक्षा असते. पण यामध्ये जर आपल्या जोडीदाराने जराही दुर्लक्ष केलं तर ते आपल्याला सहन होत नाही. नातं कोणतेही असो, प्रत्येक नात्यामध्ये अपेक्षा ही असतेच आणि ती पूर्ण करणेही गरजेचे असते.

Relationship Tips
Relationship tips : लग्नाच्यापूर्वी आपल्या जोडीदारासोबत या गोष्टी डिस्कस करा, नाते होईल आणखी घट्ट

नात्यात अनेक वाईट गोष्टी घडू शकतात, पण सर्वात वाईट म्हणजे जोडीदाराचे दुसऱ्यासोबत अफेअर असणे. हे एखाद्याला फसवण्यासारखे आहे. जेव्हा आपली भावनिक फसवणूक होते तेव्हा ही गोष्ट बऱ्याच लोकांना खूप उशीर कळते.

सुरुवातीला, त्यांना असे वाटते की, कदाचित त्यांचा जोडीदार आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल नाराज आहे, म्हणून ते त्यांच्यापासून अंतर ठेवत आहेत परंतु कालांतराने, आपल्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आली आहे हे आपल्याला जाणवू लागते. अशा वेळी काही गोष्टी वेळीच पाहिल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे समजावे.

१. वेळ न देणे -

कधी कधी असे होऊ शकते की आपला जोडीदार कामात व्यस्त असतो पण नेहमी कामाच्या बहाण्याने आपल्याला टाळत असतो. परंतु, त्याचे मन हे इतर ठिकाणी गुंतलेले असते.

Relationship Tips
Relationship Tips : बरेच पुरुष गर्लफ्रेंड किंवा पत्नीशी 'या' आठ गोष्टींबाबत खोटं सांगतात, तुमच्यासोबत 'असं' काही घडतंय का?

२. कोणत्याही नात्यात पुढे जाण्याचा -

एकमेव मार्ग म्हणजे आपल्याकडे असलेल्या तक्रारींबद्दल मोकळेपणाने बोलणे. जर आपला पार्टनर अचानक आपल्या तक्रारी आणि वाईट गोष्टी सांगू लागला तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की त्याने आपल्या चुका मोजून नाते तोडण्याचे ठरवले आहे.

३. भविष्याची भीती -

सुरुवातीला लग्न आणि एकत्र राहण्याचे वचन दिले होते पण हळूहळू या वचनाचे भीतीत रूपांतर होते. कालांतराने आपल्या जोडीदाराला (Partner) असे वाटू लागते की आपण दोघे एकत्र नाही याचे समर्थनही तो वेगवेगळ्या प्रकारे करतो.

Relationship Tips
Relationship Tips : भांडणामुळे जोडीदाराशी संवाद घडत नाही तर, 'या' उपायांनी नात्यात येईल पुन्हा गोडवा !

४. दुसऱ्याच्या गुणांप्रमाणे -

आपल्या वाईट गोष्टींसह आपल्या जोडीदाराला अचानक तिसऱ्या व्यक्तीचा स्वभाव आवडू लागतो. तो आपल्या प्रत्येक सवयीला वाईट म्हणू शकतो. त्याला एकेकाळी आवडलेल्या सवयी आणि गोष्टी अचानक वाईट दिसू लागतात.

५. प्रत्येक गोष्टीवर खोटे बोलणे -

हे देखील आपल्यापासून सत्य लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षण आहे. अशा स्थितीत आपण अनेक वेळा खोटेही पकडतात पण, आपल्या जोडीदाराचा आपल्यावर विश्वास बसत नाही. तू नेहमी माझ्यावर संशय घेतोस, संवाद जसा निसटण्याचा प्रयत्न करतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com