World Asthma Day 2022: दम्याचा त्रास होत असेल तर 'ही' काळजी घ्या...

World Asthma Day 2022: आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. थंड किंवा आंबट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे टाळावे.
If you suffer from asthma, take care of this ...
If you suffer from asthma, take care of this ...Saam Tv

World Asthma Day 2022: दमा किंवा अस्थमा असणाऱ्या रुग्णांच्या मनात जनजागृती करण्यासाठी मे महिन्यातील पहिल्या मंगळवारी 'जागतिक अस्थमा दिन' साजरा केला जातो. यंदा हा दिवस ३ मे म्हणजे आजच्या दिवशी साजरा केला जात आहे. दमा (Asthama) हा श्वसन विकाराचा त्रास आहे. या विकारात श्वास घेताना आपल्याला बरेचदा त्रास होतो तसेच आपल्या फुफ्फुसापर्यंत ऑक्सिजन (Oxygen) देखील पोहोचत नाही. पण सध्या या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हवेत होणारे प्रदूषण, झाडांची हानी यामुळे श्वास घेताना अनेकांना त्रास होताना दिसत आहे. परंतु सध्या वाढत असणाऱ्या उष्णतेमुळेदेखील (Heat) अस्थमाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या आजाराची लक्षणे कशी ओळखायची आणि त्यावर उपाय (Health Tips) कसा करायचा हे जाणून घेऊया. (If you suffer from asthma, take care of this)

हे देखील पाहा -

अस्थमा होण्यामागची कारणे (Causes of Asthma)

वाढत्या प्रदूषणामुळे या आजारांचे प्रमाण हल्ली लहान मुले आणि तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येत आहे. स्मोकिंग, धूळ, औषधे आणि तणाव हे या आजाराचे प्रमुख कारण आहे.

अस्थमाची मुख्य लक्षणे (The main symptoms of asthma)

श्वसनास त्रास, फुफ्फुसापर्यंत ऑक्सिजन न पोहोचणे, सतत खोकला येणे, छातीत दुखणे आणि चालताना धाप लागणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहे.

If you suffer from asthma, take care of this ...
कडक उन्हाचा केळीच्या पिकाला फटका; अकोल्यात केळीची बाग सुकल्याने शेतकरी हतबल

अस्थमा असेल तर काळजी कशी घ्याल? (How to take care if you have asthma?)

हा आजार पूर्णपणे नाहीसा होण्यासाठी अद्यापही कोणतेही औषध मिळालेले नाही. परंतु डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे योग्य प्रमाणात सेवन करावे. अशा रुग्णांनी घराबाहेर निघताना तोंडाला रुमाल किंवा मास्कचा वापर करावा ज्यामुळे नाका-तोंडात धूळ जाणार नाही. धूळ किंवा प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे. पाळीव प्राण्यांपासून दूर राहावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने इंहेलरचा वापर करावा. अशा रुग्णांनी आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. थंड किंवा आंबट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे टाळावे.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com