चेहऱ्यावर इंस्टेंट ग्लो हवाय तर हा फेशियल नक्की करून पहा

चेहऱ्यावरील इंस्टेंट ग्लोसाठी असा करा फेशियल
Skin care tips, Skin care, if you want instant glow on your face, try this facial
Skin care tips, Skin care, if you want instant glow on your face, try this facialब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आयुर्वेदात मधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आयुर्वेदात अनेक औषधेही मधातून दिली जातात. मधामध्ये व्हिटामीन (Vitamins) ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते.

हे देखील पहा-

मध केवळ निरोगी राहण्यासाठी किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापुरते मर्यादित नसून त्यातील गुणधर्मामुळे त्वचा सुधारण्यासही मदत करते. मधामध्ये त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याचा गुणधर्म आहे. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी ती ओलसर ठेवण्यासाठी मधाचा वापर करावा. त्वचा सुधारण्यासाठी आपण मध त्वचेवर लावल्यास त्याचे अनेक फायदे होतील. आपली त्वचा कोरडी असल्यास आठवड्यातून किमान तीनदा तरी मधाचा वापर करावा. त्वचेवर चमक आणण्यासाठी आपण हनी फेशियल कसे करू शकता हे आपण पाहूया

हनी फेशियल कसे करावे

१. त्वचा स्वच्छ करण्यासाठी संपूर्ण चेहऱ्यावर मधाचा पातळ थर लावावा. १५ मिनिटे त्वचेवर राहू द्या. सुकल्यानंतर हातावर थोडेसे पाणी (Water) घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर ओल्या टॉवेलने चेहरा स्वच्छ पुसून घ्या.

Skin care tips, Skin care, if you want instant glow on your face, try this facial
ब्युटी उत्पादनातील मेकअप ब्रशची काळजी कशी घ्याल ?

२. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी तांदळाचे पीठ मधात मिसळवून ते ओल्या चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी मसाज करुन नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. चेहरा उजळण्यास मदत होईल.

३. मध आणि केळी एकत्र करून पेस्ट बनवून संपूर्ण त्वचेला मसाज करा. काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा.

४. मसाज केल्यानंतर त्वचेची छिद्रे उघडली जातात. ते बंद करण्यासाठी बार्लीच्या पिठात मध मिसळून त्यात थोडे कच्चे दूध (Milk) आणि गुलाबजल मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून सुकू द्या. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल आणि आपली त्वचा सुंदर दिसेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com