Weight Loss Tips : झपाट्याने वजन कमी करायचे असेल तर, नाश्तासोबत सामील करा या स्मुदी

Weight Loss : निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे अत्यंत गरजेचे असते.
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam Tv

Smoothies For Weight Loss : निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे अत्यंत गरजेचे असते. सकाळच्या वेळी नाश्त्याला काही हेल्दी खाल्ले तर त्याचा रिझल्ट आपल्याला पूर्ण दिवसभर पाहायला मिळतो. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर, आम्ही सांगू त्या पद्धतीने फॉलो नक्की करा.

अनेक व्यक्ती आपले वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी भरपूर मेहनत घेतात. वर्कआउट पासून डायट पर्यंत सगळ्या गोष्टींकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिले जाते. जर तुम्हाला तुमचे वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर, तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये या गोष्टींचे सेवन करायला हवे. खरंतर हेवी ब्रेकफास्ट केल्याने तुमच्या शरीरात पूर्ण दिवस ऊर्जा बनलेली असते. जर तुम्हालाही तुमचे वजन लवकर कमी करायचे असेल तर नाश्तामध्ये या चार स्मुदीला जरूर ॲड करा.

Weight Loss Tips
Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी, अशाप्रकारे खा सफरचंद !

मिल रिप्लेसमेंट स्मुदी -

स्मुदी हे एक प्रकारचे हेल्दी फास्ट फूड (Food) असते. ज्याला कमी वेळात अगदी सोप्या पद्धतीने बनवले जाऊ शकते. सोबतच या स्मुदीचे सेवन केल्याने तुम्हाला दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही.

हे बनवण्यासाठी एवोकाडो, नारळाचे तेल, आणि काही बादाम. हे सगळे मिश्रण एकजीव करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण एका ग्लासमध्ये काढून सकाळच्या वेळी त्यासोबत तुम्हाला सेवण करायचे आहे.

अँटी इम्पलेमेटरी स्मुदी -

शरीराची जुन्यात जुनी असलेली सूज कमी करण्यासाठी तुम्ही या स्मुदीचा वापर करू शकता. ही स्मुदी बनवणे अतिशय सोपे आहे. एक टोमॅटो, पालकची काही पाने, ऑलिव्ह ऑइल, काही फळे, संत्रे, लिंबू आणि अद्रकचा रस आणि हळद मिसळून हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या. आता हे मिश्रण एका ग्लासमध्ये काढून फ्लेक्स सीड्सने गार्निश करून सर्व करा. या स्मुदीचे सेवन दररोज केल्याने तुमच्या शरीरावरील सूज कमी होऊन तुमचे वजन कमी होईल.

Weight Loss Tips
Weight Loss In 10 Days : दहा दिवसांत वजन कमी करायचे आहे ? फक्त 'हे' काम करा, फरक जाणवेल

ग्रीन स्मुदी -

वेटलॉससाठी ग्रीन स्मूदी अत्यंत फायदेशीर मानली जाते. जर तुम्ही पहिल्यांदाच स्मुदीचे सेवन करत असाल तर, तुम्ही ही ग्रीन स्मुदी नक्की ट्राय केली पाहिजे. ही स्मुदी बनवण्यासाठी फायटोन्यूट्रियंट्स आणि फायबरच्या गुणांनी संपन्न असलेले पालक घ्या.

आता यामध्ये थोडंसं पाणी, आंबा, अननस आणि केळी मिक्स करा. त्यानंतर हे सगळे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकजीव करून घ्या. चवीसाठी तुम्ही या ड्रिंकमध्ये क्रीम देखील मिसळवू शकता. आता हे मिश्रण एका ग्लासमध्ये ओतून हेल्दी स्मुदीचे सेवन करा.

पायनॅपल जींजर स्मुदी -

ही स्मुदी बनवण्यासाठी सर्वात आधी अद्रक ठेचून घ्या. त्यानंतर अद्रकमध्ये अननस मिसळावा. आता या दोघांचे मिश्रण मिक्सरमध्ये चांगले बारीक वाटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण एका ग्लासमध्ये काढून सेवन करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com