Jaundice Disease : रक्ताच्या एका थेंबातून होणार कावीळचे झटपट निदान, कसे ते जाणून घ्या

IIT Kanpur Reserach : आयटीआय कानपूर याच्या नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, रक्ताच्या एका थेंबातच कावीळचे निदान करणारे तंत्रज्ञान शोधून काढले आहे.
Jaundice Disease
Jaundice DiseaseSaam Tv

Jaundice Strip Detects :

कावीळ हा आजार संक्रमणामुळे होतो. खरेतर दूषित पाणी आणि खराब अन्नपदार्थ खाल्ल्याने कावीळ आजार होण्याची शक्यता दाट असते. जर वेळीच या आजाराकडे लक्ष दिले नाही तर गंभीर समस्यांना समोरे जावे लागते.

या आजारात लिव्हर व्यवस्थितपणे काम करत नाही. भूक कमी लागणे, पोट दुखणे, हात-पाय दुखणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु, आता या आजाराचे लवकरच निदान होणार आहे.

Jaundice Disease
Dengue Platelets Count : डेंग्यूमुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी का होतात? अशावेळी कोणते पदार्थ खावे? जाणून घ्या

आयटीआय कानपूर याच्या नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, रक्ताच्या (Blood) एका थेंबातच कावीळचे निदान करणारे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. तसेच हे तंत्रज्ञान २०२४ पर्यंत बाजारात (Market) येणार आहे.

त्यांनी अशी एक स्ट्रीप विकसित केली आहे. त्यावर रक्ताचा एक थेंब जरी टाकला तरी अवघ्या काही वेळात (Time) कावीळचे निदान होऊ शकते. साधारण कावीळची तपासणी करण्यासाठी ३ एमएल रक्ताची गरज असते. परंतु, या नव्या तंत्रज्ञानामुळे रक्ताचा केवळ एक थेंब पुरेसा आहे. त्यामुळे कावीळचे निदान झटपट होईल.

आयआयटी कानपूरचे संचालक प्रो. अभय करंदीकर यांनी सांगितले की, कानपूरच्या संशोधकांनी खास स्ट्रीप तयार केली आहे. जे आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करेल. नॅशनल सेंटर फॉर फ्लॅक्सिबल इलेक्ट्रॉनिक्समधील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील ज्येष्ठ वैज्ञानिक प्रोफेसर सिद्धार्थ पांडे आणि निशांत वर्मा या दोघांनी संशोधन केले आहे.

Jaundice Disease
Weight Loss Food : आठवड्याभरात वजन होईल झटक्यात कमी, डाएटमध्ये समावेश करा स्वयंपाकघरातील हे पदार्थ

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com