Avoid These Food In Summer : उन्हाळ्यात 'या' पदार्थांपासून होऊ शकते डिहायड्रेशन, लगेचच टाळा

Avoid These Food : उन्हाळ्यात होणारी ही सामान्य समस्या शरीरात पाण्याची कमतरता दर्शवते.
Avoid These Food In Summer
Avoid These Food In Summer Saam Tv

Avoid These Food : उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. उन्हाळ्यात होणारी ही सामान्य समस्या शरीरात पाण्याची कमतरता दर्शवते. ही समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला प्रभावित करू शकते. डिहायड्रेशनवर योग्य वेळी उपचार न केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. यामुळेच उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देतात.

कलिंगडसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे देखील या ऋतूत खाऊ शकतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण उन्हाळ्यात पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. या ऋतूत कोणकोणत्या गोष्टी खाणे-पिणे टाळले पाहिजे जेणे करून आपल्याला डिहायड्रेशन (Dehydration) होणार नाही ते जाणून घेऊया.

Avoid These Food In Summer
Hydrated During Pregnancy : गरोदरपणात हायड्रेट राहण्यासाठी प्या हे ड्रिंक्स, शरीराला मिळेल थंडावा !

कॉफी -

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळायची असेल तर किमान कॉफी (Coffee) प्या. कडक उन्हाळ्यात जास्त कॉफी पिणे चांगले नाही. यामुळे तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवू शकणार नाही.

लोणचे -

उन्हाळ्यात लोणचे खूप आवडीने खाल्ले जाते. पण त्यात भरपूर सोडियम आढळते, जे तुमच्या शरीराला डिहायड्रेट करू शकते. याशिवाय जास्त लोणचे खाल्ल्यानेही अपचन होऊ शकते.

Avoid These Food In Summer
Dehydration In Summer | उन्हाळ्यात ड्रिहायडेशन होतय? हे ड्रिंक्स ठरतील फायदेशीर

ड्रायफ्रूट्स -

ड्रायफ्रूट्समध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. पण उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्स खाणे टाळा. हे खाल्ल्याने तुमच्या शरीराचे तापमान वाढते.

मिल्क शेक -

मिल्कशेक हे उन्हाळ्यातील लोकांचे सर्वात आवडते पेय आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिल्क शेक उन्हाळ्यात (Summer) खूप निर्जलीकरण करणारा असतो. याचे कारण म्हणजे मिल्कशेकमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.

Avoid These Food In Summer
Foods For Dehydration : शरीरात पाण्याची कमतरता वारंवार होतेय ? यांना आहारात द्या स्थान, होईल अनेक रोगांपासून सुटका

मसालेदार अन्न -

मसालेदार अन्नामध्ये कॅप्सेसिनची मात्रा आढळते, ज्यामुळे पित्त दोषाचा धोका असतो. हे खाल्ल्याने शरीरात उष्णता आणि जास्त घाम येतो, ज्यामुळे डिहायड्रेशनच्या तक्रारी होऊ शकतात. याशिवाय समोसे, चाट किंवा फ्रेंच फ्राईज खाल्ल्यानेही डिहायड्रेशन होऊ शकते आणि ते पचणे कठीण होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com