Guava Thandai Recipe : वाढत्या उन्हाळ्यात बनवा पेरुची थंडीई, शरीराला मिळेल गारवा !

Summer Drinks : पेरूच्या सेवनाने पोटामधली गर्मी दूर करण्यास मदत होते.
Guava Thandai
Guava ThandaiSaam Tv

Guava Thandai Benefits : पेरूच्या सेवनाने पोटामधली गर्मी दूर करण्यास मदत होते. उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या थंडाई बनवल्या जातात. पेरूची थंडाई चवीला उत्तम असते आणि शरीरासाठी देखील फायदेशीर असते. अशातच तुम्ही यावर्षी पेरूची थंडाई ट्राय करू शकता.

पेरूची थंडाई अतिशय चविष्ट असते, सोबतच पेरूची थंडाई बनवणे अगदी सोपे असते. ही थंडाई बनवण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर देखील करू शकता. चला तर मग जाणून घेऊया पेरूची थंडाई.

Guava Thandai
Anjeer Kheer Recipe : मधुमेहींसाठी बनवा शुगर फ्री डेजर्ट, अंजीरच्या खीरीचे आरोग्याला अनेक फायदे

पेरूची थंडाई बनवण्याची सामग्री -

एक ग्लास दूध, पेरूचा ज्यूस एक ग्लास, एक कप बदाम, एक कप पिस्ता, भोपळ्याच्या बिया (Seeds) एक टेबलस्पून, वेलची पूड दोन टेबलस्पून, काळी मिरी एक टेबलस्पून, बडीशोप एक टेबलस्पून, फूड कलर गरजेनुसार, पाच ते सहा आईस क्यूब

Guava Thandai
Pudina Kachori Recipe : नाश्त्यात बनवा चविष्ट अशी पुदिना कचोरी, पाहा रेसिपी

पेरूची थंडाई बनवण्याची पद्धत -

  • पेरूची थंडाई बनवण्याआधी पेरूचा ज्यूस काढून घ्या. त्यानंतर एका कढई कमी गॅस (Gas) वरती तापवून घ्या. त्यानंतर कढईमध्ये बादाम टाकून चांगले परतून घ्या.

  • बदाम चांगल्या प्रकारे रोस्ट झाल्यावर एका वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर काजू आणि पिस्ता अशाप्रकारे भाजून घ्या.

  • ड्रायफ्रूट रोस्ट करून झाल्यानंतर, बडीशेप टाकून ती सुद्धा हलकी भाजून घ्या. आता मिक्सरमध्ये ही सगळी सामग्री टाकून चांगल्या प्रकारे पीसून घ्या.

  • आता हे मिश्रण एका मोठ्या ग्लासमध्ये काढून घेऊन त्यामध्ये वेलची पावडर टाकून मिक्स करा. त्यानंतर एका जगमध्ये अर्धे ग्लास दूध आणि अर्धे ग्लास पेरूचा ज्यूस मिक्स करा.

  • त्यानंतर दुधामध्ये तयार मिश्रण टाकून मिक्स करा. त्यानंतर मोठ्या चमच्याच्या सहाय्याने सगळे मिश्रण व्यवस्थित घोटून घ्या.

  • त्यानंतर थंडाईला चांगला रंग येण्यासाठी त्यामध्ये फूड कलर टाका.

  • त्यानंतर थंडाईला एका सर्विंग ग्लासमध्ये ओतून दोन ते तीन आईस्क्रीम टाकून पेरूच्या थंडाईचा आस्वाद घ्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com