Apple Store In India : मुंबईनंतर राजधानीत Apple Store चे उद्घाटन ! काळ्या-पिवळ्या टॅक्सीपासून मिळाली प्रेरणा...

Apple Store In Delhi : मुंबईनंतर आयफोन बनवणारी जगातील आघाडीची टेक कंपनी अॅपल आता दिल्लीतही आपले स्टोअर उघडणार आहे.
Apple Store In India
Apple Store In IndiaSaam Tv

Apple Store Opening In Delhi : मुंबईनंतर आज दिल्लीत अॅपलचे स्टोअर सुरु होणार आहे. दिल्लीतील अॅपल स्टोअर सिलेक्ट सिटी मॉल, साकेतच्या पहिल्या मजल्यावर आहे. मुंबईनंतर आयफोन बनवणारी जगातील आघाडीची टेक कंपनी अॅपल आता दिल्लीतही आपले स्टोअर उघडणार आहे.

आयफोन (IPhone) आणि अॅपलची इतर उत्पादने देशात आधीच विकली जात आहेत. मात्र अॅपलच्या स्टोअर्सबाबत देशात प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. प्रश्न पडतो की अॅपलचे स्टोअर उघडून काय फायदा होणार आहे? याचे कारण म्हणजे अॅपलने जगातील (World) रिटेल व्यवसायात ज्या प्रकारे बदल केले आहेत, त्याचे उदाहरण फार कमी वेळा पाहायला मिळते. कंपनीने 2001 मध्ये कॅलिफोर्निया आणि व्हर्जिनियामध्ये आपले पहिले रिटेल स्टोअर उघडले.

Apple Store In India
Apple Store Opening : प्रतीक्षा संपली! भारतातील पहिल्या Apple Store चे उद्घाटन, Hello Mumbai च्या Tagline अंतर्गत स्वागत...

18 एप्रिल रोजी ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी मुंबईतील ऍपल स्टोअरचे उद्धाटन केले होते. आज 20 एप्रिला दिल्लीमध्ये (Delhi) देखील ऍपल साकेत स्टोअरच्या उद्घाटनासाठी टीम कुक देखील उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. अॅपल साकेत स्टोअर आज सकाळी १० वाजल्यापासून उघडेल, त्यानंतर कोणत्याही सामान्य लोकांना या स्टोअरमधून अॅपलची सर्व उत्पादने खरेदी करता येतील आणि अनुभवता येतील. या स्टोअरची रचना शहरातील प्रतिष्ठित काळी-पिवळी टॅक्सीपासून प्रेरित आहे. या स्टोअरचे दरमहा भाडे ४२ लाख रुपये (Price) आहे. दर तीन महिन्यांनी भाडे दिले जाणार आहे.

अॅपलच्या इतर दुकानांप्रमाणेच अॅपलच्या दिल्ली स्टोअरमध्येही सर्व प्रकारची उत्पादने उपलब्ध असतील. या दुकानातून तुम्ही अॅपलचे आयफोन, मॅकबुक, अॅपल वॉच, मॅगसेफ चार्जर, चार्जिंग पॅड, माऊस, एअरपॉड, अॅपल टीव्ही यासह सर्व प्रकारची उत्पादने खरेदी करू शकता.

Apple Store In India
Age Difference between Couples : बायकोपेक्षा- नवरा वयाने किती मोठा असावा ?

अॅपलच्या या स्टोअरमध्ये सर्व उत्पादनांचे तज्ज्ञ आहेत, ज्यांच्याकडून तुम्ही कोणत्याही उत्पादनाची माहिती मिळवू शकता. याशिवाय, तुम्हाला ऍपल स्टोअरमध्ये विक्री आणि सेवेची सुविधा देखील मिळेल, म्हणजेच या स्टोअरमध्ये तुम्ही तुमचे कोणतेही उत्पादन दुरुस्त करून घेऊ शकता.

अॅपलचे साकेत स्टोअर आणि मुंबईचे स्टोअर आणि भारतात आधीच अस्तित्वात असलेल्या इतर स्टोअरमधील महत्त्वाचा फरक म्हणजे भारतात आधीपासूनच सुरू असलेले अॅपल स्टोअर्स अॅपलने अधिकृत आहेत, तर ही दोन नवीन स्टोअर्स उघडली आहेत. परंतु संपूर्ण नियंत्रण फक्त अॅपलचे आहे. या दोन्ही स्टोअरमध्ये तुम्हाला फक्त ऍपलची उत्पादने मिळतील, तर अधिकृत स्टोअरमध्येही थर्ड पार्टी कंपन्यांची उत्पादने आहेत.

Apple Store In India
How To Control Blood Sugar At Night : रोज झोपण्याआधी चार कामे करा, शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांची गरजच लागणार नाही

Apple Store मध्ये Trade-in सेवा देखील उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाची देवाणघेवाण करून Apple चे कोणतेही उत्पादन खरेदी करू शकाल. तुमच्या उत्पादनाचे विनिमय मूल्य उत्पादनाच्या सध्याच्या स्थितीवर अवलंबून असते. या अॅपल स्टोअरमध्ये हिंदी, पंजाबीसह सुमारे ४० भाषा जाणणारे कर्मचारी आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com