Thyroid : थायरॉईड नियंत्रीत ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा

थायरॉइड ग्रंथीतून थायरॉइड हार्मोन जास्त प्रमाणात सोडल्याने हा आजार होतो.
Thyroid
ThyroidSaam Tv

Thyroid : चुकीचा आहार आणि खराब दिनचर्या यामुळे लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या थायरॉइडच्या रुग्णांची संख्याही खूप वेगाने वाढत आहे. थायरॉइड ग्रंथीतून थायरॉइड हार्मोन जास्त प्रमाणात सोडल्याने हा आजार होतो. या ग्रंथीतून दोन प्रकारची संप्रेरके बाहेर पडतात. हे गळ्यातील फुलपाखराच्या आकारात असते. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या पेशींवरही परिणाम होतो. यासाठी थायरॉइड कंट्रोलमध्ये राहणं गरजेचं आहे. त्यासाठी संतुलित आहार (Diet) घ्या, रोज व्यायाम करा. तसंच आयोडीनयुक्त गोष्टींचं सेवन करून थायरॉइडवर नियंत्रण मिळवता येतं, म्हणून थायरॉइडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा. (Health)

१. नारळाचे -

थायरॉइडच्या रुग्णांसाठी नारळ हे औषधापेक्षा कमी नाही. याच्या सेवनाने थायरॉइडमध्ये आराम मिळतो. यात मध्यम साखळी फॅटी अॅसिड आणि मध्यम साखळी ट्रायग्लिसेराइड्स असतात, जे चयापचय वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी नारळाचं सेवन नक्की करा

Thyroid
Thyroid Cancer : तरुणांमध्ये वाढतो आहे थायरॉईड कर्करोगाचा आजार, वेळीच सावध व्हा !

२. केशर -

केशर आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. त्यात अमिनो अॅसिड्स आढळतात, जे थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी दुधात केशर मिसळा. यामुळे थायरॉइड नियंत्रणात राहते.

३. सीफूडचे -

सीफूडमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याव्यतिरिक्त सीफूडमध्ये आयोडीन, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडेटिव्ह, अँटी-कार्सिनोजेनिक हे गुणधर्म आहेत. त्याचे सेवन केल्याने थायरॉइड नियंत्रणात राहते.

Thyroid
मूड स्विंग व धूसर दिसणे थायरॉइडचे लक्षण नाही ना !

४. आवळा -

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते . याशिवाय आवळ्यात अनेक आवश्यक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषतः थायरॉइडमध्ये आवळ्याचे सेवन उपयुक्त ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com