मधल्यावेळेत भूक लागल्यावर या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा!

आपल्या नाश्त्यात आणि जेवणात अधिक अंतर पडते त्यामुळे आपल्याला भूक लागते.
Healthy food tips in marathi
Healthy food tips in marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कामाच्या गडबडीत आपण आपल्या आहाराकडे पुरेसे लक्ष देत नाही. बऱ्याचदा आपल्या नाश्त्यात आणि जेवणात अधिक अंतर पडते त्यामुळे आपल्याला भूक लागते. त्यावेळी आपण इतर जंक फूड किंवा चिप्स, बिस्कीट या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करतो. पण असे केल्याने आपल्याला आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम जाणवू लागतो. ऑफिसला (Office) जाण्याच्या घाईत बरेचदा आपण नाश्ता करायचे टाळतो. पण असं अजिबात करू नका.

हे देखील पहा -

आपण वेळेवर (Time) नाश्ता करायला हवा. एवढेच नाही तर नाश्त्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनचा समावेश करा. त्यामुळे तुम्हाला भूकही लागणार नाही व दिवसभर उत्साही वाटेल. अशावेळी आपण आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करायला पाहिजे ज्यामुळे आपली साखरेची पातळी नियंत्रणात राहील. मधल्यावेळी भूक लागल्यानंतर आपण कोणते पदार्थ खातो याकडे लक्ष द्या. असे न केल्यास आपल्या आरोग्यावर व वजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

या पदार्थांचा आहारात समावेश करा.

१. भूक लागल्यावर आपण आपल्याला आहारात फळांचा समावेश करू शकतो. फळे नैसर्गिकरित्या गोड असतात त्यामुळे आपल्याला त्यांचा अधिक प्रमाणात लाभ होतो.

Healthy food tips in marathi
मुलांचे खराब हस्ताक्षर सुधारण्यासाठी काही सोप्या युक्त्या

२. पनीरचा अशावेळी आहारात समावेश करावा. पनीरमध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असते. काळीमिरी पावडर व मीठ टाकून खाल्यास चवही लागते.

३. मधल्यावेळी किंवा भूक लागल्यावर आपण चिप्स खातो त्यावेळी आपण सलाद किंवा स्प्राऊट्सचे सेवन करावे.

४. दुधात (Milk) फळे, मध, ड्राय फ्रुट्स व सब्जा घालून पुडिंग तयार करा याचा देखील आपण आहारात समावेश करू शकतो.

५. ऑफिस किंवा घरून काम करताना आपण मधल्या वेळेत पॉपकॉर्न आपण खाऊ शकतो. पॉपकॉर्न हे पचायला हलके असते व त्यामुळे साखरेची पातळीदेखील नियंत्रणात राहाते.

६. तसेच आपण अशावेळी ओट्सचे कुकीज किंवा ओट्समध्ये दुधासोबत अनेक फळाचा आपण आहारात समावेश करू शकतो.

७. मधल्यावेळेत भूक लागल्यावर आपण कुरमुरे खाऊ शकतो. कुरमुऱ्यात मीठ, मिरची, चणे व इतर पदार्थ घालूनही त्याचा आस्वाद घेऊ शकतो.

या पदार्थांचा आपण मधल्यावेळेत समावेश करू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com