Glowing And Healthy Skin
Glowing And Healthy Skin Saam Tv

Glowing And Healthy Skin : ग्लोइंग व हेल्दी त्वचेसाठी आहारात आज सामील करा या फळांचा !

सुंदर दिसण्यासाठी व त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत ब्युटी प्रॉडक्ट लावून ठेवणे गरजेचे नसते.

Glowing And Healthy Skin : तुम्ही तुमच्या आहारत योग्य पदार्थांचे सेवन न केल्यास तुमच्या त्वचेवर त्याचे उलट परीणाम पाहायला मिळतील. फक्त सौंदर्यप्रसाधनामुळे तुमची त्वचा सुंदर दिसू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहरात फळांचा आहार घेणे फार आवश्यक आहे.

आपण आपल्या आहारात योग्य पदार्थांचे सेवन केल्यास आपल्या चेहऱ्यावरील समस्या दूर होऊ शकतात. सुंदर दिसण्यासाठी व त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत ब्युटी प्रॉडक्ट लावून ठेवणे गरजेचे नसते. तुम्ही तुमच्या त्वचेला मुलायम आणि ग्लोइंग बनवण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे.

Glowing And Healthy Skin
Skin Glowing : त्वचेवर ग्लो आणायचा आहे ? तर, 'या' फेस पॅकचा वापर करा

त्याचबरोबर तुमच्या आहारात फळांचा देखील समावेश असला पाहिजे. बॉलीवूड अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी सौंदर्यप्रसाधने तर वापरतातच परंतु त्वचेला आतमधून उजळण्यासाठी त्या फलआहार घेत असतात. त्याचबरोबर चकाकणाऱ्या कांतीसाठी दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाणी पिलेच पाहिजे.

त्याचबरोबर हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसाठी फळे खाणे फार गरजेचे असते. पपई हे फळ स्किनकेअर साठी सर्वात उत्तम फळ मानले जातं. पपईमध्ये पेपाइन हे एंजाईम असते जे आपल्या त्वचेवरील मृत पेशींना बाहेर टाकून देते. व त्वचा मुलायम बनवते.

Glowing And Healthy Skin
Glowing skin care tips : चमकदार त्वचेसाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा

त्याचबरोबर चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी देखिल पपई उपुक्त ठरते. त्याचबोबर द्राक्ष देखिल तुमच्या त्वचेसाठी फारच गुणकारी असते. द्राक्षांमध्ये विटामिन सी चे गुण असतात. जे आपल्या चेहऱ्यावरील मासपेशिंना मजबूत करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

त्यानंतर लिंबू देखील आपल्या चेहऱ्यासाठीउपयुक्त असतो. निस्तेज त्वाचला सुधारण्याचं काम लिंबू करतो. त्याचबरोबर लिंबूने चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या मिटवण्याचे काम लिंबू करतो.

तसेच ब्ल्यूबेरी देखिल आपल्या त्वचेसाठी गुणकारी असते. ब्ल्यूबेरी, ब्लॅकबेरी, बेरी या फळांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी उपलब्ध असते. त्याचबरोबर या फळांमध्ये एलिजिक ऍसिड देखिल असते. ते आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com