
Skin Care : वृद्धत्व थांबवणे अशक्य आहे पण जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि त्वचेची काळजी याच्या मदतीने आपण त्याची लक्षणे नक्कीच बऱ्याच अंशी कमी करू शकतो. सुरकुत्या हे वृद्धत्वाच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे.
सौंदर्य आणि आहार यांचा खुप जवळचा संबंध आहे. पण, ही गोष्ट अनेक महिलांना माहित नसल्याने त्या आहाराकडे दुर्लक्ष करून केवळ विविध सौंदर्यवृद्धीसाठी उपाय करत असतात. यामुळे अनेकदा या उपायांचा परिणाम दिसून येत नाही. सुंदर त्वचेसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक आहे.
ज्यावर मात करण्यासाठी बहुतेक लोक सौंदर्य (Beauty) उपचारांचा अवलंब करतात. पण हे पुरेसे नाही, तुम्ही तुमच्या आहारातही काही महत्त्वाचे बदल केले पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत, जे त्वचेचा घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठी खूप मदत करतात.
जर आपण आहार जास्ती जास्त ताज्या भाज्या आणि फळाचा समावेश केला तर त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो. जर तुम्हाला सुंदर त्वचा हवी असेल तर टोमेटोच्या सेवनाने जास्त फायदा होईल. पपई, कलिंगड, खरबूज, पेरू, आलुबुखारा, जांभूळ, लिची इत्यादी बिया असलेली फळे त्वचेसाठी लाभदायक असतात. ही फळे त्वचेला भरपूर पोषण देतात. यामधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशी नष्ट होऊ देत नाहीत. त्यामुळे त्वचा नितळ होते.
पनीर किंवा दही -
जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा मजबूतपणा टिकवून ठेवायचा असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात पनीरचा समावेश असलेल्या दुबळे प्रोटीनयुक्त पदार्थ घेणे सुरू करावे. पनीरमध्ये असलेले प्रोटीन त्वचा घट्ट होण्यास मदत करते. याशिवाय दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थ आहाराचा भाग बनवा.
ग्रीन टी -
जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा (Skin) पोत सुधारायचा असेल तर दुधाचा चहा सोडून ग्रीन टी प्यायला सुरुवात करा. ग्रीन टी फक्त वजन कमी करण्यासाठीच काम करत नाही तर त्यात पॉलीफेनॉल असतात, जे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असतात. हे प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते आणि त्वचेचा घट्टपणाही कायम राहतो.
क्रूसिफेरस भाज्या -
कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, ब्रोकोली या भाज्यांचा क्रूसिफेरस भाज्यांच्या यादीत समावेश आहे. जे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात (Diet) खाण्यास सुरुवात करावी. त्यामुळे म्हातारपणातही त्वचा सैल होत नाही. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक आणि सेलेनियम लक्षणीय प्रमाणात असते. जे कोलेजनचे उत्पादन वाढवतात. याशिवाय ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन नावाचा एक विशेष घटक असतो, जो त्वचेचा कर्करोग रोखण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.
गाजर -
गाजरात व्हिटॅमिन ए जास्त असते. ते सनबर्न आणि बारीक रेषा टाळते. व्हिटॅमिन ए तुमची त्वचा निरोगी ठेवते. हे तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते. यामुळे आपण आपल्या आहारामध्ये गाजराचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे.
अॅव्होकॅडो
अॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट असते. ते त्वचा चमकदार आणि हायड्रेटेड ठेवण्याचे काम करते. अॅव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. हे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. यामुळेच सुंदर त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये अॅव्होकॅडोचा समावेश करा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.