या आहाराचा समावेश उन्हाळ्यात करा आणि थकव्यापासून दूर रहा..!

असा करा आहारात समावेश
Summer Tips
Summer Tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुबंई: उन्हाळ्यात आपण लवकर थकतो. किरकोळ गोष्ट केली नाही की, आपण घामाने पूर्णपणे भिजतो व आपल्याला थोड्याच वेळात दमही लागतो. सूर्याची उष्णता शरीरातील ऊर्जा शोषून घेते आणि आपण थकतो. अशा हवामानात भूक कमी आणि तहान जास्त लागते. यामुळेच शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही आणि आपल्याला थकवा, अशक्तपणा आणि अस्वस्थ वाटू लागते.

खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतल्यास शरीराला कोणत्याही हवामानाशी लढण्याची ताकद मिळते. या कडक उन्हाळ्यात योग्य आहार घेतल्यास थकवा, अशक्तपणा आणि अस्वस्थता ही लक्षणे टाळण्यास मदत होईल.

हे देखील पहा -

या आहाराचा समावेश करा.

१. नाश्त्यात दूध-अंडीचा समावेश -

सकाळच्या नाश्त्यात दूध आणि अंडी यांचा समावेश केल्यास दिवसभर उत्साही राहण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. अंड्यांमध्ये अमिनो अॅसिड असते तर दुसरीकडे, दुधात कॅल्शियम आणि प्रथिने जास्त असतात. त्यामुळे तुमचे पोट भरलेले राहिल व तुम्हाला भूकही लागणार नाही.

२. कडधान्यांचा समावेश -

नाश्त्यामध्ये मूग, शेंगा, नट आणि बिया यांसारख्या कडधान्यांचा समावेश करू शकतात. या गोष्टींमध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्याची अधिक शक्यता असल्याने, लिंबूपाणी, बार्ली आणि नारळपाणी यांसारखे आरोग्यदायी पदार्थांचा (Food) समावेश करु शकता.

Summer Tips
Home Tips :भंगारातून करा कलाकुसर आणि सुंदर बनवा घर

३. भरपूर हंगामी फळे खा -

उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात टरबूज, खरबूज, अननस, आंबा (Mango), स्ट्रॉबेरी, संत्री आणि इतर पाणीदार फळांचे सेवन करा. त्यामुळे तुमच्या शरीरात अधिक काळ पाणी टिकण्यासाठी मदत होते.

४. अधिक हिरव्या भाज्या खा

उन्हाळ्यात तूरी, करवंद, टिंडा, कोथिंबीर, ब्रोकोली, कारले आदी भाज्यांचे सेवन वाढवावे. या भाज्या (Vegetable) डिहायड्रेशनपासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करते. तसेच या भाज्यांमध्ये भरपूर पाणी आणि पोटॅशियम असतात, जे उच्च रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करतात.

५. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका -

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे जास्त साधे पाणी पिणे टाळा, कारण ते तुमच्या शरीरातील खनिजे कमी करते. त्याऐवजी ग्रीन टी, लिंबूपाणी किंवा ताजे नारळाचे पाणी प्या त्यामुळे शरीराला आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्व मिळेल. ही पेये तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

डिस्क्लेमर: या आहाराचा समावेश करताना कृपया आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com