इलेक्ट्रिक स्कूटर घेताय तर सावधान! आगीच्या घटना वाढतायेत, अशी घ्या काळजी

इलेक्ट्रिक स्कुटरला लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय.
Electric Bike
Electric BikeSaam TV

नाशिक: पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत चालल्यानं पेट्रोलवरील दुचाकी वापरणं परवडेनासं झालंय. त्यामुळे खर्चात बचतीसाठी अनेक जण इलेक्ट्रिक स्कुटर (Electric Bike) अर्थात ई-बाईक खरेदी करता आहेत. मात्र तुम्हीही ई-बाईक खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नेमकी ई-बाईकला आग का लागतेय, त्याची काय कारणं आपण जाणून घेवूयात.

- ऑटो एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार इंटरनल कंब्शन इंजिन-ICE वाहनांमध्ये आग लागल्याचा अधिक धोका असतो. या वाहनांमध्ये असलेली लिथियम आयन बॅटरीमुळे आग अधिक भीषण लागू शकते. तसंच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लागलेली आग विझवणं अधिक कठिण असल्याचं एक्सपर्टचं म्हणणं आहे.

Electric Bike
Breaking: सलग ४ दिवस चौकशीला हजर राहा; हायकोर्टाचे किरीट सोमय्यांना आदेश

- स्कूटरच्या निर्मितीवेळी काही कमी राहिल्यास, एक्सटर्नल डॅमेज अथवा खराब सॉफ्टवेअर हे देखील आगीचं कारण असू शकतं. खराब झालेल्या अथवा डॅमेज सेलमध्ये अधिक हीट निर्माण होते. यात एका सेलमध्ये निर्माण झालेली हीट दुसऱ्या सेलमध्ये पोहोचते, यामुळे चेन रिऍक्शन होऊन देखील आग लागू शकते.

इलेक्ट्रिक स्कुटरला लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. मात्र आपल्या इलेक्ट्रिक स्कुटरची आणि बॅटरीची योग्य निगा राखली, वेळोवेळी तपासणी केली, सर्व्हिसिंगची कामं केली, तर अशा घटना टाळता येणं, शक्य असल्याचं एक्स्पर्टचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हीही इलेक्ट्रिक स्कुटर वापरत असाल, अथवा विकत घेणार असाल. तर इलेक्ट्रिक स्कुटर वापरताना योग्य ती काळजी घ्या आणि तुमच्या बाईकची वेळोवेळी निगा राखा.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com